भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेला पाचवा कसोटी सामना रोमांचक स्थितीत आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ५ विकेट्स गमावल्यानंतर इंग्लंडचे फलंदाज जॉनी बेयरस्टो आणि कर्णधार बेन स्टोक्स यांनी भारतीय गोलंदाजांवर आक्रमण करायला सुरुवात केली आहे. यादरम्यान विराट कोहली आणि बेयरस्टो यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
त्याचे झाले असे की, भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) ३२ वे षटक टाकण्यासाठी आला होता. या षटकातील दुसरा चेंडू शमीने आऊटसाईड ऑफवर टाकला, ज्यावर बेयरस्टोने (Jonny Bairstow) ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू आतून आल्याने बेयरस्टो बाद होण्यापासून थोडक्यात वाचला. यावेळी यष्टीमागे यष्टीरक्षक रिषभ पंतच्या नजीक विराट कोहली (Virat Kohli) क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. हा चेंडू खेळून झाल्यानंतर विराट आणि बेयरस्टोमध्ये (Virat Kohli And Jonny Bairstow Clash) शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला.
https://twitter.com/Abdullah__Neaz/status/1543535641966694401?s=20&t=_XD5E7fvQhSoxH6DdFAc_g
बेयरस्टोने तो फटका मारल्यानंतर क्षेत्ररक्षण करत असलेला विराट हसायला लागला. त्याचे हे कृत्य कदाचित बेयरस्टोला आवडले नाही आणि यामुळे तो विराटला काहीतरी बोलला. यावर विराटही मागे हटला नाही आणि त्यानेही बेयरस्टोच्या उत्तराला प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे वाद आणखीनच वाढला. विराट बेयरस्टोला कसे खेळायचे, हे सांगताना दिसला. यावर बेयरस्टोने हाताने इशारा करत त्याला प्रत्युत्तर दिले. मग पंचांनी मध्यस्थी करत त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघांनीही माघार घेतली नाही.
https://twitter.com/Iamshib/status/1543535245626322944?s=20&t=XPy1TfoAjpgaYtScc8TS9g
https://twitter.com/AbhayThakur981/status/1543539804347850752?s=20&t=VOAGRpquTjRZHVLNBt2aUQ
नंतर विराट तोंडावर बोट ठेवत बेयरस्टोला शांत राहण्याचा इशारा करताना दिसला. त्याने पुढे आपली स्लेजिंग सुरू ठेवली. परंतु बेयरस्टोला त्याने कसलाही फरक पडला नाही. बेयरस्टोने या वादानंतर काही आकर्षक फटके खेळले आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. ८१ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने त्याने ५० धावा केल्या.
https://twitter.com/Sagar_Kabir10/status/1543538926677151746?s=20&t=HkriPBdonQN5UE5RFbJRYg
https://twitter.com/18vkkk/status/1543535130249084928?s=20&t=rljaw4_b1fXgZzWiaRNKVg
मात्र विराट आणि बेयरस्टोमध्ये झालेल्या या चकमकीच्या प्रसंगाने दर्शकांचे लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावर विराट आणि बेयरस्टोमधील वादाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अँडरसनसोबत २०१४मध्ये झालेल्या वादाचे प्रत्यत्तुर जडेजाने तोंडाने नाहीतर बॅटने दिले
…म्हणून मुंबई इंडियन्स आहे आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ! बुमराह-ब्रॉडच्या ‘त्या’ षटकाशी आहे कनेक्शन
एजबस्टन कसोटीमध्ये विराट बनला मेंटर, कॅप्टन बुमराहला ‘अशी’ केली मदत






