भारतीय संघाला श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या अंतिम आणि निर्णायक टी-२० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरा टी-२० सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. कृणाल पंड्याला कोरोना झाल्याचे उघड झाल्यानंतर त्याच्यासह संघातील आणखी ८ खेळाडू संघाबाहेर झाले होते. त्यामुळे उर्वरित २ टी-२० सामन्यात भारतीय संघाला नवीन संघासह मैदानात उतरावे लागले.
या सामन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दबाव या युवा खेळाडूंवर स्पष्टपणे दिसून येत होता. परिणामी भारतीय संघाला ही मालिका २-१ ने गमवावी लागली आहे. पण तिसरा सामना झाल्यानंतर भारतीय कर्णधाराने संघातील खेळाडूंचे तोंडभरून कौतुक केले आहे. यासह पराभवाचे कारण देखील सांगितले आहे.
तिसरा टी-२० सामना झाल्यानंतर शिखर धवनने म्हटले की, “आमच्यासाठी ही एक कठीण परिस्थिती होती. एक संघ म्हणून आम्ही इथे थांबण्याचा आणि मालिका खेळण्याचा निर्णय घेतला होता. मला माझ्या खेळाडूंवर खूप अभिमान आहे. त्यांनी गेल्या २ सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आम्हाला जिंकायचे होते. परंतु दरवेळी यश येते असेल नाही. प्रत्येक सामन्यातून आपण काही ना काही शिकत असतो.”
“फलंदाजीसाठी हा दिवस आमच्यासाठी चांगला नव्हता. संघातील फलंदाज लवकर माघारी परतले होते. श्रीलंका संघाने चांगली गोलंदाजी केली. जेव्हा तुमचे फलंदाज लवकर बाद होतात. तेव्हा संघातील खेळाडूंवर दबाव वाढतो. मला आनंद आहे की, आम्ही या सामन्यात ८० धावांचा पल्ला गाठू शकलो,” असेही तो म्हणाला. (Shikhar dhawan statement on India Series defeat against srilanka)
संघातील ९ खेळाडू झाले होते बाहेर
दुसरा टी-२० सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेले हार्दिक पंड्या, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव,इ शान किशन सह संघातील प्रमुख खेळाडू बाहेर झाले होते. त्यामुळे संघातील युवा खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. दुसऱ्या डावात ३ गडी राखून पराभूत केल्यानंतर तिसऱ्या सामना देखील श्रीलंका संघाने ७ गडी राखून आपल्या नावावर केला आणि ही मालिका २-१ ने जिंकली.
भारतीय संघाचा फ्लॉप शो
तसेच सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न होता. परंतु हा प्रयत्न अयशस्वी ठरला. भारतीय संघाला २० षटकअखेर अवघ्या ८१ धावा करण्यात यश आले. यामध्ये कुलदीप यादवने सर्वाधिक २३ धावांचे योगदान दिले.
श्रीलंका संघाने २-१ ने मालिका केली नावावर
दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंका संघाला विजय मिळवण्याची सुवर्णसंधी होती. या संधीचा श्रीलंका संघाने दोन्ही हातांनी स्वीकार केला. धनंजय डी सिल्वाने या सामन्यात सर्वाधिक २३ धावांची खेळी करत श्रीलंका संघाला सामना जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
हृदय जिंकलंस! ज्यांनी टी२० मालिकेत दिला दारुण पराभवाचा धक्का, त्यांनाच ‘गब्बर’ने दिला बहुमुल्य वेळ
विजयाचा उन्माद! टी२० मालिकेत श्रीलंकेचा टीम धवनला धोबीपछाड, जल्लोषात हसरंगाचे लाजिरवाणे कृत्य
वयाच्या तिशीत वॉरियरच्या डोक्यावर सजली ‘पदार्पणाची कॅप’; आनंदाने झाला भावूक, फुटलं रडू