इंडियन प्रीमियर लीगचा तेरावा हंगाम मावळतीला आला आहे. आता केवळ अंतिम सामन्याची रोमहर्षक लढत उरली आहे. तत्पूर्वी रविवारी (८ नोव्हेंबर) अबु धाबीमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात ‘जिंकू वा मरू’ची लढत झाली. या लढतीत दिल्ली संघाच्या फलंदाजांचा धाक पाहायला मिळाला. त्यातही सलामीवीर फलंदाज शिखर धवनने आक्रमक फलंदाजी करत नव्या विक्रमाला गवसणी घातली.
धववने केला मोठा विक्रम
दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली आणि मर्यादित २० षटकात १८८ धावा केल्या. दरम्यान धवनने सलामीला फलंदाजीला येत शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता केवळ ५० चेंडूत ७८ धावांची खेळी केली. यात त्याच्या ६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. यासह धवनने आयपीएल कारकिर्दीत ४३ वेळा ५०पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केला.
धवनपूर्वी हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने सर्वाधिक ५२वेळा हा पराक्रम केला आहे. त्याच्याव्यतिरिक्त रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने ४४वेळा एका सामन्यात ५०पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तसेच एबी डिविलियर्स (४१वेळा), रोहित शर्मा (३९ वेळा) आणि सुरेश रैना (३९ वेळा) या फलंदाजांनीही हा किर्तीमान नोंदवला आहे.
धवनची आयपीएल २०२०मधील आकडेवारी
आयपीएलच्या १३व्या हंगामात धवनने कमालीचे प्रदर्शन केले आहे. त्याने कुणालाही न जमलेले विक्रमही यंदा नोंदवले आहेत. या हंगामात आतापर्यंत त्याने १६ सामने खेळले असून ६०३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २ शतकांचा आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२० लिलावात ‘हे’ काम करताच मुंबईला सापडली यशाची किल्ली!
खुशखबर! आयपीएलनंतर रोहित होणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना?
‘हिटमॅन’ रोहित शर्माची बायोग्राफी झाली लाँच, जाणून घ्या सविस्तर
ट्रेंडिंग लेख-
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
लईच वाईट! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ‘फ्लॉप’ ठरलेले ३ भारतीय खेळाडू