शिखर धवनने १९ धावांवर बाद होऊनही टी२०मध्ये केला हा मोठा पराक्रम

नागपूर। रविवारी(१० नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात पार पडलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक टी२० सामन्यात(3rd T20I) भारताने ३० धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने ३ सामन्यांची टी२० मालिका २-१ अशा फरकाने जिंकली आहे.

या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन १६ चेंडूत १९ धावा करुन बाद झाला होता. पण असे असले तरी त्याने एक खास विक्रम केला आहे.

त्याने आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीत १५०० धावांचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार करणारा तो भारताचा केवळ ५ वा खेळाडू ठरला आहे. याआधी रोहित शर्मा, विराट कोहली, एमएस धोनी आणि सुरेश रैना या भारतीयांनी हा पराक्रम केला आहे.

शिखरच्या आता आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ५८ सामन्यात २७.८५ च्या सरासरीने १५०४ धावा झाल्या आहेत. यामध्ये त्याच्या ९ अर्धशतकांचा समावेश आहे.

शिखर बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या टी२०मध्ये शफिउल इस्लामच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याचा झेल महमुद्दुलाहने घेतला.

आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज –

२५३९ धावा – रोहित शर्मा

२४५० धावा – विराट कोहली

१६१७ धावा – एमएस धोनी

१६०५ धावा – सुरेश रैना

१५०४ धावा – शिखर धवन

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.