---Advertisement---

Video: धवनच्या पुष्पा चित्रपटातील ‘त्या’ रीलवर अल्लु अर्जुनची मजेदार कमेंट

On: गुरूवार, जानेवारी 13, 2022 6:32 PM
Shikhar Dhawan
---Advertisement---

‘गब्बर’ म्हणुन ओळखला जाणारा भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन हा सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतो आणि तो त्याच्या फोटो आणि व्हिडिओमुळे जोरदार चर्चेत देखील असतो. त्याने नुकतेच त्याच्या इंस्टाग्राम खात्यावरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो शानदार अभिनय करताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये तो नुकताच प्रदर्शित झालेल्या अल्लु अर्जुनच्या सुपरहिट ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटाची नकल करताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून प्रतिक्रिंयांचा जोरदार वर्षाव होत आहे. धवनने या व्हिडिओ रिलमध्ये अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटातील मुख्य डायलॅाग बोलला आहे. धवनच्या या रिलवर अल्लु अर्जुननेसुद्धा मजेदार भाष्य केले आहे. धवनने अल्लु अर्जुनला चित्रपटाच्या यशावर भाष्य करत शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CYlflAuKX8N/

धवनने या व्हिडीओमध्ये टोपी घातली आहे आणि म्हटलं आहे की, “पुष्पा…पुष्पा राज झुकेगा नहीं”. चाहत्यांना धवनचा हा व्हिडीओ फार आवडला आहे आणि आत्तापर्यंत जवळजवळ ६ लाख लोकांनी हे रिल लाईक केलं आहे. लोकांना धवनची नक्कल इतकी आवडली की, त्याने साउथच्या चित्रपटांमध्ये जावे असे सल्ले लोकांनी त्याला दिले आहेत. इंस्टाग्रामवर धवनचे ९६ लाखांहुन अधिक फॅालोअर्स आहेत. तो इंस्टाग्रामवर सतत रिल्स पोस्ट करत असतो.

Shikhar Dhawan Instagram
Photo Courtesy: Instagram/@shikhardofficial

१९ जानेवारी पासुन सुरु होणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेसाठी धवनची निवड करण्यात आली आहे. धवन बुधवारीच (१२ जानेवारी) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना झाला आहे. मालिकेचा पहिला सामना १९ जानेवारीला आहे, तर दुसरा २१ जानेवारी आणि तिसरा २३ जानेवारीला खेळवला जाणार आहे. शिखर तब्बल सहा महिन्यांनंतर भारतीय संघात परतला आहे. तो भारतीय संघासोबत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात संघाचा कर्णधार होता, तेव्हा शेवटचा संघाकडून खेळताना दिसला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

Video: कसाही फेका चेंडू, बॅटनेच उत्तर देणार! जेन्सनच्या स्लेजिंगला पंतचे ताबडतोब उत्तर

“द्रविड कुटुंबाचा भाग असल्याचा अभिमान”, म्हणत मराठी अभिनेत्रीच्या ‘द वॉल’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या वेळापत्रकात झाला बदल, जाणून घ्या कारण

वादापासून आयुष्यभर चार हात लांब राहिलेला Rahul Dravid जेव्हा क्रिकेटप्रेमींच्या डोक्यात गेला होता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---