---Advertisement---

धवनने सोशल मीडियावर पोस्ट केला अत्यंत भावनिक व्हिडिओ; सांगितले आयुष्यातील दुःख

shikhar-dhawan
---Advertisement---

भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज शिखर धवन (shikhar dhawan) मागच्या बऱ्याच दिवसांपासून संघाच्या बाहेर आहे. मागच्या काही काळापासून तो संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, अद्याप तो संघातील स्वतःचे स्थान पुन्हा मिळवू शकलेला नाही. तसेच त्याच्या वैयक्तिक आयुष्यात देखील मागच्या काही काळात मोठे चढउतार आले आहेत. अशात त्याला मानसिक ताण येणे सहाजिकच आहे. धवनने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे, जो चाहत्यांमध्ये तुफान व्हायरल झाला आहे.

धवनने हा व्हिडिओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केला आहे. हा व्हिडिओत त्याने एका सुप्रसिद्ध शायरीचा उपयोग केला आहे. तो म्हणत आहे की, “चांगल्यांनी चांगले आणि वाईटांनी वाईट म्हटले मला. चांगल्याने चांगले आणि वाईटांनी वाईट म्हटले मला, कारण ज्यांना जितकी गरज होती, तेवढेच ओळखले मला.” धवनने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये देखील हिच वाक्ये लिहिली आहेत.

https://www.instagram.com/reel/CYHQoH_ol1N/?utm_medium=copy_link

धवनचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना खूपच आवडल्याचे दिसत आहे. त्याच्या एका चाहत्याने तर, तो भारतीय संघाचा सर्वोत्तम सलामीवीर असल्याचे म्हटले आहे. चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले की, “मी तुमच्यावर प्रेम करतो सर. तुमच्यापेक्षा चांगला सलामीवीर भारतीय संघात असूच शकत नाही.”

दरम्यान, धवनला त्याच्या सततच्या खराब खेळामुळे अगोदर कसोटी संघातून बाहेर होण्याची वेळ आली होती. तसेच सामन्या स्ट्राइक रेटमुळे तो सध्या भारताच्या मर्यादित षटकांच्या संघातून देखील बाहेर आहे. धवनच्या जागी युवा फलंदाजांना संधी दिली जात आहे. यापूर्वी २०२१ मध्ये श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात धवन सहभागी होता. या दौऱ्यात त्याने संघाचे नेतृत्वदेखील केले होते.

संघातून बाहेर होण्यासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यात देखील एक मोठी घटना घडली आहे. अलिकडच्या काळाताच धवन आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी यांचा घटस्फोट झाला आहे. या दोघांच्या घटस्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. त्याव्यतिरिक्त त्याची आयपीएल फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटल्सने देखील त्याला पुढच्या हंगामासाठी रिटेन केले नाही. आयुष्यात चाललेल्या या घडामोडींमध्ये त्याने सोशल मीडियावर या व्हिडिओच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या –

अबब! भारतीय संघाने ४० षटकात कुटल्या तब्बल ४६६ धावा; दोन फलंदाजांची तुफानी शतके

Year Ending 2021 | टीम इंडियासाठी यंदाचं वर्ष राहिलंय दुर्देवी, ऐतिहासिक विजय मिळवलेच, पण २ आयसीसी ट्रॉफीही गमावल्या

Year Ending 2021 | ‘ही’ आहे कसोटी क्रिकेटमधील २०२१ ची सर्वात फ्लॉप ‘प्लेइंग इलेव्हन’

व्हिडिओ पाहा –

क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार | Explanation Of Duck In Cricket And Its Type

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---