---Advertisement---

Year Ending 2021 | टीम इंडियासाठी यंदाचं वर्ष राहिलंय दुर्देवी, ऐतिहासिक विजय मिळवलेच, पण २ आयसीसी ट्रॉफीही गमावल्या

On: शुक्रवार, डिसेंबर 31, 2021 3:30 PM
Virat-Kohli (Team India)
---Advertisement---

भारतीय संघाला (Indian Cricket Team) क्रिकेटविश्वातील बलाढ्य संघांपैकी एक समजले जाते. याच भारतीय संघाने वर्ष २०२१ मध्ये मोठमोठ्या प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध शानदार प्रदर्शन करत ऐतिहासिक विजयही मिळवले आहेत. मात्र आयसीसीच्या २ मोठ्या स्पर्धा जिंकण्यापासून मात्र ते वंचित राहिले. एकीकडे पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी चँपियनशीप (ICC Test Championship) च्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारून त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. दुसरीकडे टी२० विश्वचषकातील (ICC T20 World Cup) त्यांचे प्रदर्शन तर अतिशयच सुमार राहिले.

भारतीय संघाने यंदा वर्षभरात १६ टी२० सामने खेळले आहेत. त्यातील १० सामन्यात विजय तर ६ सामन्यात संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्यांनी ६ सामने खेळताना ४ सामने जिंकले आणि २ सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. मर्यादित षटकांच्या या स्वरुपाला वगळता क्रिकेटमधील सर्वात जुन्या प्रकारात अर्थात कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे प्रदर्शन शानदार राहिले आहे. या वर्षात भारतीय संघाने कसोटीत १४ सामने खेळताना ८ सामन्यात विजय आणि ३ सामनयात पराभवाचे तोंड पाहिले, तर उर्वरित ३ सामने अनिर्णित राहिले आहेत.

मालिकांबाबतीत बोलायचं झाल्यास तर, भारतीय संघाने २०२१ मध्ये खेळलेल्या दोन्ही वनडे मालिका जिंकल्या आहेत, तर टी२०च्या बाबतीत त्यांना २ मालिकांमध्ये विजय आणि एका मालिकेत पराभवास सामोरे जावे लागले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ४ मालिका खेळताना त्यांनी ३ मालिकांमध्ये बाजी मारली आहे, तर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचा निकाल लागलेला नाही.

याच भारतीय संघाच्या १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंतच्या प्रदर्शनाचा लेखाजोखा आपण पाहूयात. (Indian Team Performance In 2021)

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (India tour of Australia, 2020-21)
भारतीय संघाने यावर्षी ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाविरुद्धच ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ ने दणदणीत विजय मिळवला आहे. ही मालिका डिसेंबर २०२० मध्ये खेळली सुरू झाली होती, ज्यातील २ सामने जानेवारी महिन्यात झाले होते. त्यातही पाहुणा म्हणून गेलेल्या भारतीय संघाने चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्या ऑस्ट्रेलियाला ३ विकेट्सने पराभूत केले होते. गाबाच्या मैदानावर भारताचा हा पहिलाच कसोटी विजय राहिला होता.

७-११ जानेवारी – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तिसरी कसोटी: अनिर्णित
१५-१९ जानेवारी – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चौथी कसोटी: भारताचा ३ विकेट्सने विजय

इंग्लंडचा भारत दौरा (England tour of India, 2021)
फेब्रुवारी २०२१ मध्ये इंग्लंडचा संघ भारत दौरा आल्यावर होता. या दौऱ्या उभय संघांमध्ये ४ सामन्यांची कसोटी मालिका, ५ सामन्यांची टी२० मालिका आणि ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली गेली होती. यातील कसोटी मालिकेत भारतीय संघाने इंग्लंडचा ३-१ ने धुव्वा उडवला होता. तर टी२० मालिकेतही संघाने ३-२ ने बाजी मारली होती. त्यानंतर वनडे मालिकेतही भारतानेच २-१ ने विजय मिळवला होता.

५-९ फेब्रुवारी – भारत विरुद्ध इंग्लंड, पहिली कसोटी: इंग्लंड २२७ धावांनी विजयी
१३-१७ फेब्रुवारी – भारत विरुद्ध इंग्लंड, दुसरी कसोटी: भारत ३१७ धावांनी विजयी
२४-२८ फेब्रुवारी – भारत विरुद्ध इंग्लंड, तिसरी कसोटी: भारताचा १० विकेट्सने विजय
४-८ मार्च – भारत विरुद्ध इंग्लंड, चौथी कसोटी: भारत एक डाव आणि २५ धावांनी विजय

१२ मार्च – भारत विरुद्ध इंग्लंड, पहिला टी२०: इंग्लंडचा ८ विकेट्सने विजय
१४ मार्च – भारत विरुद्ध इंग्लंड, दुसरी टी२०: भारत ७ विकेट्सने विजयी
१६ मार्च – भारत विरुद्ध इंग्लंड, तिसरा टी२०: इंग्लंडचा ८ विकेट्सने विजय
१८ मार्च – भारत विरुद्ध इंग्लंड, चौथा टी२०: भारताचा ८ धावांनी विजय
२० मार्च – भारत विरुद्ध इंग्लंड, पाचवी टी२०: भारताचा ३६ धावांनी विजय

२३ मार्च – भारत विरुद्ध इंग्लंड, पहिला वनडे सामना: भारताचा ६६ धावांनी विजय
२६ मार्च – भारत विरुद्ध इंग्लंड, दुसरी वनडे: इंग्लंड ६ विकेट्सने विजयी.
२८ मार्च – भारत विरुद्ध इंग्लंड, तिसरी वनडे: भारत ७ धावांनी विजयी.

आयसीसी जागतिक कसोटी चँपियनशीप २०२१ (ICC World Test Championship Final 2021)
कसोटी चँपियनशीपच्या पहिल्यावहिल्या हंगामातील अंतिम सामना जून २०२१ मध्ये खेळवला गेला होता. १८ ते २३ जूनदरम्यान झालेल्या या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे आमने सामने होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताला २१७ धावा करता आल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने २४९ धावा करत भारतावर आघाडी घेतली होती.

त्यानंतर आपल्या दुसऱ्या डावात तर भारतीय संघ १७० धावांवरच गारद झाला होता. त्यामुळे आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने ४६ षटकांमध्येच हा महत्त्वपूर्ण सामना जिंकत जेतेपदही पटकावले होते. अशाप्रकारे भारतीय संघाकडून हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेला होता.

१८ ते २३ जून – भारत विरुद्ध न्यूझीलंड, अंतिम सामना: न्यूझीलंडचा ८ विकेट्सने विजय

भारताचा श्रीलंका दौरा (India tour of Sri Lanka, 2021)
जुलै महिन्यात शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात भारतीय संघाने ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळले होते, ज्यातील वनडे मालिका भारताने २-१ ने जिंकली होती. तर टी२० मालिकेत त्यांना १-२ ने पराभव पत्करावा लागला होता.

१८ जुलै – भारत विरुद्ध श्रीलंका, पहिला वनडे सामना: भारताचा ७ विकेट्सने विजय
२० जुलै – भारत विरुद्ध श्रीलंका, दुसरी वनडे: भारताचा ३ विकेट्सने विजय
२३ जुलै – भारत विरुद्ध श्रीलंका, तिसरी वनडे: डकवर्थ-लुईस नियमानुसार श्रीलंकेचा ३ विकेट्सने विजय.

२५ जुलै – भारत विरुद्ध श्रीलंका, पहिली टी२०: भारताचा ३८ धावांनी विजय.
२८ जुलै – भारत विरुद्ध श्रीलंका, दुसरी टी२०: श्रीलंका ४ विकेट्सने विजयी.
२९ जुलै – भारत विरुद्ध श्रीलंका, तिसरा टी२०: श्रीलंका ७ विकेट्सने विजयी.

भारताचा इंग्लंड दौरा (India tour of England, 2021)
एकीकडे शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ श्रीलंकेत मर्यादित षटकांची मालिका खेळण्यासाठी गेला होता. दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ इंग्लंडमध्ये होता. तिथे त्यांनी २-१ ने कसोटी मालिकेत आघाडी घेतली होती. परंतु कोरोनामुळे मालिकेतील शेवटचा चौथा साना स्थगित करण्यात आला, ज्यामुळे मालिकेचा निकाल लागू शकला नाही.

४-८ ऑगस्ट – भारत विरुद्ध इंग्लंड, पहिली कसोटी: अनिर्णित
१२-१६ ऑगस्ट – भारत विरुद्ध इंग्लंड, दुसरी कसोटी: भारत १५१ धावांनी विजयी
२५-२९ ऑगस्ट – भारत विरुद्ध इंग्लंड, तिसरी कसोटी: इंग्लंड एक डाव आणि ७६ धावांनी विजयी
२-६ सप्टेंबर – भारत विरुद्ध इंग्लंड, चौथी कसोटी: भारताचा १५७ धावांनी विजय
१०-१४ सप्टेंबर – भारत विरुद्ध इंग्लंड, पाचवी कसोटी: सामना कोरोनामुळे पुढे ढकलला.

आयसीसी टी२० विश्वचषक (ICC Mens T20 World Cup 2021)
टी२० विश्वचषक २०२१ विराट कोहलीचा टी२० संघाचा कर्णधार म्हणून शेवटचा हंगाम होता. या विश्वचषकातील भारतीय संघाचे प्रदर्शन अतिशय खराब राहिले होते. पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघांविरुद्ध साखळी फेरी सामन्यांमध्ये पराभव मिळाल्यामुळे भारतीय संघाला सुपर-१३ फेरीतूनच बाहेर पडावे लागले होते.

२४ ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, सुपर-१२: पाकिस्तान १० विकेट्सने विजयी
३१ ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड, सुपर-१२ न्यूझीलंड८ विकेट्सने विजयी
३ नोव्हेंबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, सुपर-१२: भारत ६६ धावांनी विजयी
५ नोव्हेंबर – भारत विरुद्ध स्कॉटलंड, सुपर-१२: भारताचा ८ विकेट्सवे विजय
८ नोव्हेंबर – भारत विरुद्ध नामिबिया, सुपर-१२: भारताचा ९ विकेट्सने विजय

न्यूझीलंडचा भारत दौरा (New Zealand tour of India, 2021)
टी२० विश्वचषकानंतर लगेचच न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. भारताने या दौऱ्यातील टी२० मालिकेत न्यूझीलंडला ३-० ने क्लिन स्वीप केले होते. त्यांनतरच्या कसोटी मालिकेतही भारताच्याच पारड्यात विजय पडला होता. पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर भारताने दुसरा सामना जिंकत मालिकेवर नाव कोरले होते.

१७ नोव्हेंबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड, पहिला टी२०: भारताचा ५ विकेट्सने विजय.
१९ नोव्हेंबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुसरी टी२०: भारत ७ विकेट्सने विजयी.
२१ नोव्हेंबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड, तिसरा टी२०: भारताचा ७३ धावांनी विजय

२५-२९ नोव्हेंबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड, पहिली कसोटी: अनिर्णित
३-७ डिसेंबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुसरी कसोटी: भारत ३७२ धावांनी विजयी

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा २०२१-२२ 
भारतीय कसोटी संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून २०२१ वर्षाच्या अखेरीस या दौऱ्याची कसोटी मालिकेने सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना २६ ते ३१ डिसेंबर दरम्यान खेळला गेला. हा सामना भारतीय संघाने ११३ धावांनी जिंकला. या दौऱ्यातील उर्वरित २ कसोटी सामने आणि ३ वनडे सामने पुढीलवर्षी म्हणजेच जानेवारी २०२२ मध्ये खेळवण्यात येणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडिया १६ डिसेंबरला होणार दक्षिण आफ्रिकेला रवाना, ‘इतके’ दिवस राहणार बायो-बबलमध्ये

आयडीया! रनआऊट होऊ नये म्हणून डार्सी शॉर्टने केले असे कृत्य की पाहून पोट धरून हसाल – Video

‘महाराष्ट्राची नंबर १ डीश’ म्हणत सचिन तेंडुलकरने मिसळ पाववर मारला ताव, व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ पाहा – 

आख्खी कारकिर्द संपली, पण पठ्ठे कधीही शून्यावर बाद झाले नाहीत | Batsman without Ducks in ODI Cricket

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---