आयपीएल 2023 चा 14 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला गेला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात यजमान कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचवेळी प्रथम फलंदाजी करताना पंजाबसाठी कर्णधार शिखर धवन याने एकाकी झुंज दिली. त्याने नाबाद 99 धावांची खेळी केली. यासह त्याचा एका खास यादीत समावेश झाला.
पहिले दोन सामने जिंकत पंजाबने या हंगामात दमदार सुरुवात केली. या सामन्यात ते विजयाची हॅट्रिक करण्याच्या इराद्याने मैदानात आले. मात्र, हंगामात प्रथमच हैदराबादच्या गोलंदाजांनी आपला दर्जा दाखवला. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर संघाला यश मिळवून दिले. त्यानंतर जेन्सन व मलिकने प्रत्येकी दोन बळी मिळवले. बऱ्याच कालावधीनंतर आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उतरलेल्या लेगस्पिनर मयंक मार्कंडेने पंजाबच्या गोलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवले. त्याने पंजाबची वाताहात केली. अखेरच्या विकेटसाठी शिखरने मोहित राठीसह 55 धावांची नाबाद भागीदारी करत संघाला 143 पर्यंत पोहोचवले.
सलामीला फलंदाजीला आलेल्या शिखरने अखेरपर्यंत नाबाद राहताना 66 चेंडूंवर 99 धावांची खेळी केली. यामध्ये 12 चौकार व 5 षटकारांचा समावेश होता. यासह शिखरने हंगामात ऑरेंज कॅप देखील आपल्याकडे घेतली.
या नाबाद 99 धावांच्या खेळीसह शिखर आयपीएल इतिहासात 99 धावांवर नाबाद राहणारा चौथा फलंदाज ठरला. 2013 मध्ये चेन्नईसाठी खेळणारा सुरेश रैना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अशा प्रकारे नाबाद राहिलेला. 2019 मध्ये ख्रिस गेलही आरसीबीविरुद्ध 99 धावांच्या पुढे जाऊ शकला नव्हता. तर, 2021मध्ये मयंक अगरवालने दिल्लीविरुद्ध नाबाद 99 धावांची खेळी केलेली. त्यानंतर या यादीमध्ये आता शिखरचे नाव सामील झाले आहे.
(Shikhar Dhawan Become Fourth Batter Who Remains Not Out On 99 In IPL History)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सलग तीन पराभवानंतर संतापले दिल्लीचे संघमालक! ट्विट करत आपल्याच संघावर ‘या’ शब्दांत बरसले
राशिदने केली करामत! केकेआरविरुद्ध घेतली ‘ऐतिहासिक’ हॅट्रिक,आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून पहिलाच