भारतीय क्रिकेट संघ नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला आहे. या दौऱ्यात उभय संघ शिखर धवन याच्या नेतृत्त्वाखाली ३ सामन्यांची वनडे मालिका खेळत आहेत. या मालिकेतील पहिला सामना ३ धावांनी जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही धवनच्या नेतृत्त्वाखालील संघाने २ विकेट्स राखून विजय मिळवला आहे.
या थरारक विजयासह भारतीय संघाने २-० च्या फरकाने मालिकाही नावावर केली आहे. यासह कर्णधार धवनच्या नावे नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. धवन वेस्ट इंडिजमध्ये जाऊन वेस्ट इंडिजला वनडे मालिकेत पराभूत करणारा भारताचा पाचवा कर्णधार बनला आहे.
भारतीय संघाने आतापर्यंत वेस्ट इंडिजमध्ये जाऊन फार कमी वनडे मालिका जिंकल्या आहेत. यातील सर्वाधिक २ वेळा वेस्ट इंडिजमध्ये वनडे मालिका जिंकून देण्यात विराट कोहलीला यश आले आहे. माजी कर्णधार विराटने वेस्ट इंडिजमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाला २ वनडे मालिका जिंकून दिल्या आहेत. विराटबरोबरच एमएस धोनी, सौरव गांगुली, सुरेश रैना यांनीही कर्णधार म्हणून वेस्ट इंडिजमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका जिंकल्या आहेत.
सर्वप्रथम गांगुलीने वेस्ट इंडिजमध्ये भारतीय संघाला वनडे मालिका जिंकून दिली होती. त्यानंतर धोनी, रैना आणि विराटने ही परंपरा पुढे नेली. आता धवनचेही नाव या यादीत जोडले गेले आहे.
वेस्ट इंडिजमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका जिंकून देणारे कर्णधार-
२ वेळा – विराट कोहली
१ वेळा – एमएस धोनी
१ वेळा – सौरव गांगुली
१ वेळा – सुरेश रैना
१ वेळा – शिखर धवन
दरम्यान भारतीय संघाने वेस्ट इंडिजमध्ये येऊन वेस्ट इंडिजला पराभवाची धूळ चारली आहे. केवळ ३ धावांच्या फरकाने पहिला वनडे सामना जिंकत पाहुण्या भारताने वनडे मालिकेची दमदार सुरुवात केली होती. त्यानंतर आता सलग दुसऱ्या वनडे सामन्यात २ विकेट्सने त्यांनी विजय मिळवला आहे. अशाप्रकारे ३ सामन्यांची वनडे मालिका २-० ने जिंकली आहे. आता तिसरा आणि अखेरचा वनडे सामना २७ जुलै रोजी होईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
WI vs IND | वेस्ट इंडीजविरुद्ध मिळालेल्या यशाचे श्रेय आयपीएललाचं, वाचा शिखर धवन काय म्हणाला
‘बापू’ तारी बॅटिंग कमाल छे! अक्षर पटेलच्या मॅच विनिंग षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
वेस्ट इंडिजला झुकवत भारताने मिळवला ‘नंबर १’चा ताज, खास विश्वविक्रमात पाकिस्तानला टाकले मागे