---Advertisement---

‘मला विश्वचषक खेळायचा आहे, त्यामुळे…’, भारतीय संघात परतल्यानंतर शिखर धवनचे मोठे विधान

On: मंगळवार, जुलै 12, 2022 7:04 PM
Shikhar-Dhawan-Rahul-Dravid
---Advertisement---

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत शिखर धवन भारतीय संघाचा कर्णधार असेल. वास्तविक, शिखर धवन बराच काळ भारतीय संघातून बाहेर होता, परंतु आयपीएल २०२२ मध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर तो टीम इंडियामध्ये परतला आहे. आता या दिग्गज फलंदाजाने मोठे वक्तव्य केले आहे. शिखर धवनने आता त्याचे पुढील लक्ष्य काय आहे हे सांगितले.

‘माझे लक्ष पुढील वर्षीच्या विश्वचषकावर आहे’
शिखर धवन म्हणाला की, “आता माझे लक्ष पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकावर आहे. यामुळे मी जास्तीत जास्त सामने खेळण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणाला की, सध्या मी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, पुढील वर्षी विश्वचषक भारतात होणार आहे. त्यामुळे फॉर्म अबाधित राहावा यासाठी मला जास्तीत जास्त सामने खेळायचे आहेत.” हे लक्षात घेण्यासारखे आहे की शिखर धवन बराच काळ भारतीय संघातून आत-बाहेर करत होता, परंतु या खेळाडूला वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग बनवण्यात आले आहे. तसेच या मालिकेत शिखर धवन भारताचा कर्णधार असेल.

वेस्ट इंडिज मालिकेसाठी रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे
विशेष म्हणजे आगामी वेस्ट इंडिज मालिकेसाठी रोहित शर्मासह अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे शिखर धवन भारतीय संघाची कमान सांभाळणार आहे. त्याचबरोबर भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. एजबॅटसन कसोटी गमावल्यानंतर भारतीय संघाने शानदार पुनरागमन करत यजमान इंग्लंडला टी०२ मालिकेत २-१ ने पराभूत केले. या दौऱ्यावर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादित षटकांच्या सामन्यांची मालिका खेळणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग!, भारतात परतल्यानंतर केएल राहुल पहिले करणार लग्न

पेढे वाटा पेढे! केकेआरच्या ‘या’ क्रिकेटरच्या घरी आला नवा पाहुणा, पत्नीने गोंडस मुलाला दिला जन्म

नाणेफेकीचा कौल भारताच्या पारड्यात, कोहलीच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी; पाहा प्लेइंग XI

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---