शिखर धवन खूप हसतमुख आणि प्रसन्न व्यक्तीमत्व आहे. तो मैदानावर नेहमी मस्ती करताना दिसतो. गब्बर खूप चांगला मित्र देखील आहे. त्याची संघातील अन्य साथिदारांसोबत उत्तम बॉन्डिंग आहे. शिखर धवननं विराट कोहली आणि रोहित शर्माला त्याचे जवळचे मित्र म्हटलं आहे. याशिवाय, शुबमन गिलला त्याच्या जागी संघात घेण्याबाबतही तो बोलला आहे. ‘गब्बर’ मित्र म्हणून किती चांगला होता, हे तुम्हाला या तीन घटनांवरून कळून येईल.
(3) शिखर धवन – शुबमन गिल : भारताच्या एकदिवसीय संघात शिखर धवनच्या जागी युवा सलामीवीर शुबमन गिलचाही समावेश करण्यात आला होता. त्यावेळी एका मुलाखतीत बोलताना शिखर म्हणाला होता की, जर तो स्वत: निवडकर्ता असता, तरीही त्यानं त्याच्याऐवजी शुबमन गिलची निवड केली असती. ही खूप मोठी गोष्ट आहे. संघातील आपली जागा दुसऱ्या व्यक्तीला देणं आणि त्याचा उघडपणे स्वीकार करणं अजिबात सोपं नाही.
(2) शिखर धवन – विराट कोहली : शिखर धवननं एका मुलाखतीत विराट कोहलीसोबत त्याचं नातं कसं आहे, हे सांगितलं होतं. धवन म्हणाला, “विराट मला फनी रील्स पाठवत असतो. आम्ही दोघंही ते शेअर करतो. विराट आणि माझी विनोदबुद्धी सारखीच आहे. आम्हा दोघांनाही एक सारखीच गाणी आवडतात. जेव्हा मी टीम बसमध्ये बसायचो, तेव्हा विराट यायचा आणि गाणे ऐकण्यासाठी माझ्या कानातील एअरबर्ड्स लावायचा.
(1) शिखर धवन – रोहित शर्मा : शिखर धवनने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, जेव्हा तो रोहित शर्मासोबत भारतासाठी ओपनिंग करायचा, तेव्हा तो गाणं म्हणायचा. धवन म्हणाला, “मी जेव्हा खेळपट्टीवर गाणं म्हणत असे, तेव्हा त्याला (रोहितला) ते खूप आवडायचे. तो माझ्याकडे बघायचा आणि तेच गाणं म्हणायचा. असं अनेकवेळा घडलं आहे. रोहितला जर त्या गाण्याच्या काही ओळी आठवत असेल, तर तो देखील ते गाणे म्हणायचा.”
हेही वाचा –
शिखर धवनच्या निवृत्तीनंतर हे 3 खेळाडूही करू शकतात क्रिकेटला अलविदा
10 वर्ष मोठ्या महिलेशी लग्न केलं, छळाचं कारण देत घटस्फोट घेतला! खूपच वेदनादायी आहे शिखर धवनची लव्ह स्टोरी
शिखर धवनला ‘गब्बर’ नाव कसं मिळालं? टोपण नावामागची रंजक कहानी जाणून घ्या