---Advertisement---

विंडीज विरुद्ध कसोटीत संधी न मिळालेल्या शिखर धवनचा झाला या भारतीय संघात समावेश

On: शनिवार, ऑगस्ट 31, 2019 4:23 PM
---Advertisement---

तिरुअनंतपूरम। भारत अ संघाची सध्या दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध 5 सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनचा भारत अ संघात समावेश करण्यात आला आहे.

त्याचा दुखापतग्रस्त विजय शंकरच्या ऐवजी भारतीय अ संघात समावेश केला आहे.

याबद्दल बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात माहिती दिली आहे की ‘अखिल वरिष्ठ निवड समीतीने दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यांसाठी शिखर धवनचा भारत अ संघात समावेश केला आहे.’

शिखर धवन याआधी वेस्ट इंडीज दौऱ्यात वरिष्ठ भारतीय संघाकडून वनडे आणि टी20 मालिकेत खेळला आहे. पण त्याला या मालिकेत खास काही करता आलेले नाही. त्याने या दोन्ही मालिकेत मिळून 65 धावा केल्या आहेत. तसेच त्याची सध्या भारताची वेस्ट इंडीज विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेसाठी संघात निवड झालेली नाही.

पण 15 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिका संघाबरोबर भारताच्या वरिष्ठ संघाची 3 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे, या मालिकेसाठी शिखरचा भारताच्या संघात समावेश करण्यात आलेला आहे. पण त्याआधी त्याला दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध भारत अ संघाकडून 4 आणि 6 सप्टेंबरला चौथा आणि पाचवा वनडे सामना खेळावा लागणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

याच दिवशी ८ वर्षांपुर्वी द्रविडने घेतला होता क्रिकेटमधील सर्वात मोठा निर्णय

वाढदिवस विशेष- भारताचा दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

व्हिडिओ: बरोबर ५१ वर्षांपुर्वी या खेळाडूने एकाच षटकात मारले होते ६ षटकार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment