न्यूझीलंड विरुद्ध भारत (NZvIND) यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (25 नोव्हेंबर) खेळला गेला. हा सामना ऑकलंडच्या इडन पार्कवर खेळला गेला. फलंदाजांनी शानदार कामगिरी केल्यानंतरही गोलंदाजांना आलेल्या अपयशामुळे भारतीय संघाला या पहिल्या सामन्यात सात गडी राखून पराभूत व्हावे लागले. या दौऱ्यावर भारताचा पहिल्य पसंतीचा संघ गेलेला नाही. अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघ येथे खेळतोय. या सामन्यातही शिखरने संघाचे नेतृत्व केले. मात्र, त्याचवेळी भारतीय संघाचा वनडे कर्णधार नक्की कोण आहे असा प्रश्न देखील आता उपस्थित होताना दिसतोय.
भारतीय संघाचा पूर्ण वेळ कर्णधार म्हणून रोहित शर्माची मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात निवड केली गेलेली. मात्र, त्यानंतर आता जवळपास वर्षभरानंतर असे दिसून येत आहे की, रोहित हा भारताचा प्रमुख नव्हे तर बदली कर्णधार आहे.
रोहित कर्णधार झाल्यापासून भारतीय संघाने 19 वनडे सामने खेळले आहेत. त्यातील केवळ 6 सामन्यात तो सहभागी झालाय. त्यानंतर सहा सामन्यात केएल राहुलने संघाचे नेतृत्व केले आहे. विशेष म्हणजे या नियमित कर्णधार आणि उपकर्णधारापेक्षा जास्त सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करण्याचा मान शिखर धवनने मिळवला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात नाणेफेकीसाठी उतरताना त्याने आपल्या सातव्या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले.
भारतीय संघाच्या टी20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर रोहितकडून टी20 संघाचे नेतृत्व काढून घेतले जाऊ शकते. त्याच्या जागी हार्दिक पंड्या पुढील टी20 कर्णधार होऊ शकतो. रोहित पुढील वर्षी भारतातच होणाऱ्या वनडे विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल. यासोबत रोहितकडे भारताच्या कसोटी संघाचे देखील नेतृत्व आहे.
(Shikhar Dhawan Captain India Most Since Rohit Become Full time Captain In ODI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडेत धवन-गिल जोडी सुपरहिट! आकडेवारी पाहून तुम्हालाही येईल चक्कर
किवींच्या भूमीवर श्रेयस अय्यरची ऐतिहासिक खेळी! फिफ्टी करताच धोनीला टाकले मागे