---Advertisement---

IPL 2020 – शिखर धवनने घेतला कार्तिकचा सुपर डुपर झेल, पाहा व्हिडिओ

On: रविवार, ऑक्टोबर 4, 2020 2:16 PM
---Advertisement---

शनिवारी आयपीएल २०२० च्या हंगामातील १६ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने कोलकातावर १८ धावांनी विजय मिळवला. हा दिल्लीचा या हंगामातील तिसरा विजय आहे. या सामन्यात दिल्लीकडून क्षेत्ररक्षण करताना सलामीवीर शिखर धवनने कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकचा शानदार झेल घेतला.

दिल्लीने दिलेल्या २२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताकडून १० व्या षटकात कार्तिक ५ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. पण तो लगेचच १३ व्या षटकात हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर शिखरच्या हातून झेलबाद झाला. यावेळी कार्तिकने हर्षलच्या चेंडूवर पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. पण चेंडू बॅटच्या वरच्या बाजूला लागून मिड-ऑफच्या दिशेला गेला. तिथे शिखर क्षेत्ररक्षण करत होता. त्याने उजव्या बाजूला उडी घेत कार्तिकचा शानदार झेल घेतला.

कार्तिक बाद होण्याआधीच्या चेंडूवर नितिश राणा बाद झाला होता. त्यामुळे कोलकाताची अवस्था ६ बाद १२२ धावा अशी झाली होती. पण नंतर राहुल त्रिपाठी आणि ओएन मॉर्गनने तुफानी खेळी करत कोलकाताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र १९ व्या षटकात मॉर्गन आणि २० व्या षटकात त्रिपाठी बाद झाल्याने कोलकाताला २१० धावाच करता आल्या. मॉर्गनने १८ चेंडूत ५ षटकार आणि १ चौकारासह ४४ धावा केल्या आणि त्रिपाठीने १६ चेंडूत ३६ धावा केल्या.

तत्पूर्वी दिल्लीकडून श्रेयस अय्यरने नाबाद ८८ धावांची खेळी केली. तर पृथ्वी शॉने ६६ धावांची खेळी केली. त्यामुळे दिल्लीला २० षटकात ४ बाद २२८ धावा करता आल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---