आयपीएल २०२२चा सोळावा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात झाला. या सामन्यात उभय संघ त्यांचा हंगामातील तिसरा विजय नोंदवण्यासाठी प्रयत्नशील दिसले. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबकडून सलामीवीर शिखर धवन याने दमदार विक्रम आपल्या खात्यात नोंदवला. भारताच्या या धाकड फलंदाजाने या यामन्यादरम्यान ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमधील आपले १००० हजार चौकार पूर्ण केले आहेत.
या सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखालील गुजरात संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली होती. त्यामुळे पंजाबकडून कर्णधार मयंक अगरवाल आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) सलामीला फलंदाजीसाठी आले होते. मात्र संघाच्या केवळ ११ धावांवर मयंक बाद झाल्यामुळे त्यांची सलामी जोडी तुटली. असे असले तरीही, धवनने पुढे संघाची खिंड लढवली.
त्याने गुजरातच्या भेदक माऱ्याचा सामना करताना महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने बरेच खणखणीत चौकारही मारले. मात्र त्याने पाचव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर लॉकी फर्ग्युसनला मारलेला चौकार त्याच्यासाठी विक्रमी ठरला. या चौकारासह त्याने ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमधील आपल्या १००० चौकारांचा (1000 Fours In T20 Cricket) आकडा गाठला आहे. त्याच्यापूर्वी सचिन तेंडूलकर, एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा अशा एकाहून एक सरस फलंदाजांनाही हा पराक्रम करता आलेला नाही. तो ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये १००० चौकार मारणारा पहिलाच भारतीय फलंदाज (First Indian Bowler) आहे.
या विक्रमात वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल अव्वलस्थानी आहे, ज्याने ११३२ चौकार मारले आहेत. तर ऍलेक्स हेल्स, डेविड वॉर्नर आणि ऍरोन फिंचही पहिल्या ४ जणांमध्ये आहेत.
ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार (Most Fours In T20 Cricket)-
११३२- ख्रिस गेल
१०५४- ऍलेक्स हेल्स
१००५- डेविड वॉर्नर
१००४- ऍरोन फिंच
१०००- शिखर धवन*
पंजाब विरुद्ध गुजरात सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन-
पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): मयंक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), जितेश शर्मा, शाहरुख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, राहुल चाहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), शुबमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशीद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, दर्शन नळकांडे
महत्वाच्या बातम्या-
पंजाब किंग्जच्या प्लेइंग ११वरून भारताच्या माजी दिग्गजाने घेतली फिरकी, शेअर केला फिल्मी व्हिडिओ
धोनीनंतर आता तोच नवा फिनिशर! टी२० विश्वचषकासाठी शास्त्रींकडून ३६ वर्षीय क्रिकेटरला पाठिंबा