बंगळूरु। रविवारी(22 सप्टेंबर) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. तसेच 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली.
या सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला असला तरी भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने एक खास विक्रम केला आहे. त्याने या सामन्यात 25 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 36 धावांची खेळी केली. याबरोबरच त्याने ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये(सर्व टी20 स्पर्धा) 7000 हजारांचा टप्पा पार केला आहे.
शिखर हा टप्पा पार करणारा एकूण 15 वा खेळाडू तर भारताचा 4 था फलंदाज ठरला आहे. याआधी भारताच्या विराट कोहली, रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांनी हा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे या तिघांनीही ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये 8000 धावांचा टप्पाही पार केला आहे.
शिखरच्या आता ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये 248 सामन्यात 31.96 च्या सरासरीने 7032 धावा आहेत. यामध्ये त्याच्या 53 अर्धशतकांचा समावेश आहे.
तसेच सध्या ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये विराट कोहली अव्वल क्रमांकावर आहे. त्याने 271 सामन्यात 40.74च्या सरासरीने 8556 धावा केल्या आहेत.
तसेच टी20 क्रिकेटमध्ये जगातील एकूण क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक धावा ख्रिस गेलने केल्या आहेत. त्याने 391 सामन्यात 38.86 च्या सरासरीने 13021 धावा केल्या आहेत.
ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू –
8556 धावा – विराट कोहली (271 सामने)
8392 धावा – सुरेश रैना (319 सामने)
8312 धावा – रोहित शर्मा (318 सामने)
7032 धावा – शिखर धवन (248 सामने)
6621 धावा – एमएस धोनी (317 सामने)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारताचे माजी कसोटीपटू माधव आपटेंचे निधन
–हार्दिक पंड्याचा कॅच घेत डेव्हिड मिलरने केली या विश्वविक्रमाची बरोबरी
–गौतम गंभीर म्हणतो ‘या’ दिग्गज भारतीय क्रिकेटपटूची जर्सी निवृत्त करा