ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे आणि टी२० मालिकेत दमदार कामगिरी केलेला सलामीवीर शिखर धवन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी शिखर अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध संवादाची नक्कल करताना दिसतोय. धवनने सोमवारी (२१ जानेवारी) इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपल्या मित्राबरोबर अमिताभ बच्चन यांचा सुप्रसिद्ध चित्रपट कालियातील एक संवाद बोलताना दिसून येत आहे. धवनने यापूर्वीही अनेकदा असे मनोरंजक व्हिडिओ बनवले आहेत.
कोरोना काळात धवनने बनवले होते व्हिडिओ
कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये धवनने असे अनेक मजेदार व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केले होते. ३५ वर्षीय धवनने आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला. ज्यामध्ये तो सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या एका संवादावर अभिनय करताना दिसून आला. कालिया चित्रपटातील, ‘हम जहा खडे होते है लाईन वही से शुरू होती है’ या संवादावर त्याने आपल्या मित्रासह अभिनय केला.
धवनने या व्हिडिओखाली, ‘गब्बर जहा खडा होता है, लाईन वही से शुरू होती है’ असे कॅप्शन लिहिले आहे. अल्पावधीतच धवनच्या या व्हिडिओला चाहत्यांची पसंती दिली.
https://www.instagram.com/p/CJDaXMbDOq_/?utm_source=ig_web_copy_link
आयपीएल आणि ऑस्ट्रेलियामध्ये धवनने केली शानदार कामगिरी
कोरोना काळानंतर धवनने आयपीएल २०२० मध्ये दमदार कामगिरी केली होती. युएईमध्ये झालेल्या स्पर्धेत धवनने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दोन शतकांसह ६०० हून अधिक धावा बनविल्या होत्या. स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंमध्ये तो दुसर्या स्थानी राहिला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ही त्याची कामगिरी चांगली राहिली. वनडे मालिकेतील तीन सामन्यात त्याने ७४, ३० व १६ धावा बनविलेल्या. टी२० मालिकेतही त्याने अनुक्रमे १, ५२ व २८ धावांचे योगदान दिले होते.
धवन सध्या भारताच्या कसोटी संघातून बाहेर आहे. भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळतोय. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; ‘या’ खेळाडूचे पुनरागमन
विराट भारतातून करणार संघाला मार्गदर्शन; कसं ते वाचा