---Advertisement---

लढाई कोरोनाविरुद्धची! गरजवंतांच्या मदतीसाठी धावला शिखर धवन, ‘या’ योगदानाबद्दल पोलिसांनीही मानले आभार

---Advertisement---

सध्या संपूर्ण भारतात कोरोनाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे आले आहेत. यात क्रिकेट क्षेत्राचाही समावेश आहे. क्रिकेट क्षेत्रामधूनही मोठी मदत कोरोनाविरुद्धच्या लढाईत होत आहे. आता भारताचा सलामीवीर शिखर धवन देखील मदतीला पुढे आला आहे.

शिखर धवन याने लोकांमध्ये वितरित करण्यासाठी अनेक ऑक्सिजन संचांची मदत केली आहे. गुरुग्राम पोलिसांनी त्याच्या या मदतीबद्दल ट्वीट करत त्याचे आभार मानले आहेत. गुरुग्राम पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले की, ऑक्सिजन संच पुरवल्याबद्दल शिखर धवन यांचे आभारी आहोत.

धवनने प्रत्युत्तरात ट्विट केले, “या महामारीच्या काळात माझ्या लोकांची सेवा केल्याबद्दल कृतज्ञ आहे. ही एक छोटी मदत! आपल्या लोकांना पूर्णपणे मदत करण्यास सदैव तत्पर. भारत या महामारीच्या या संकटातून बाहेर येईल आणि चमकेल!”

यापूर्वी क्रिकेट क्षेत्रातून मदतीचा हात 

यापूर्वीदेखील अनेक क्रिकेटपटू यावेळी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदतीसाठी पुढे आले आहेत. यात पॅट कमिन्स, ब्रेट ली, निकोलस पूरन, जेसन बेऱ्हेंडॉर्फ अशा परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तसेच भारतीय खेळाडूंमध्येही अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा एक मोहिम राबवली. या मोहिमेअंतर्गत 11 कोटींहून अधिक रुपये जमवत मदत त्यांनी केली. यासाठी त्यांनी स्वत: २ कोटींचे दान दिले आहे. याच मोहिमेत युजवेंद्र चहलनेही योगदान दिले आहे.  याशिवाय हार्दिक आणि कृणाल पंड्या यांनी २०० ऑक्सिजन संचांची मदत केली आहे.

याशिवाय रिषभ पंत, सचिन तेंडुलकर, इरफान आणि युसुफ पठाण, गौतम गंभीर, जयदेव उनाडकट, श्रीवत्स गोस्वामी, लक्ष्मीरतन शुक्ला, आर अश्विन, अजिंक्य रहाणे अशा अनेक भारतीय क्रिकेटपटूंनीही मदतीचा हात पुढे केला आहे.

एवढेच नाही तर क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि एस्टोनिया क्रिकेट बोर्डांनींही भारताच्या कोरोना विरुद्धच्या लढ्यात योगदान दिले आहे. याशिवाय दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, चेन्नई सुपर किंग्स अशा आयपीएलमधील अनेक संघांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.

धवनला मिळू शकते भारताचे कर्णधारपद

दरम्यान, धवनच्या आयपीएल 2021 मधील कामगिरीचा विचार केला असता त्याने शानदार कामगिरी केली होती. धवनने खेळलेल्या 8 सामन्यात 380 धावा केलेल्या होत्या. यादरम्यान त्याने 3 अर्धशतके देखील झळकावली होती.

भारतीय संघ आगामी काळात इंग्लंड व श्रीलंकेचा सोबतच दौरा करणार आहे. श्रीलंका दौऱ्यात प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत धवनला भारतीय संघाचे नेतृत्व दिले जाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. भारतीय संघ या दौर्‍यात 3 वनडे व 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. जर धवनला कर्णधारपद देण्यात आले, तर भारतीय संघाला त्याच्याकडून आणखीनच उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

इंग्लंडच्या कठीण दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला ‘अशाप्रकारे’ करावी लागेल कोरोना चाचणी

आता क्रिकेटमध्ये ‘बायो-बबल’ ऐवजी वापरला जाणार ‘हा’ शब्द?

सेहवाग म्हणतो भारताच्या ‘या’ खेळाडूमध्ये दिसते युवा कायरन पोलार्डची झलक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---