भारतीय पुरुष संघ घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध टी20 आणि वनडे मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकेंमध्ये प्रत्येकी तीन-तीन सामने खेळले जाणार आहेत. या दोन्ही मालिकांसाठी भारताचा संघ जाहीर झाला असून टी20मध्ये भारताचे नेतृत्व हार्दिक पंड्या, तर वनडेत रोहित शर्मा करणार आहे. टी20 मालिकेसाठी भारताच्या अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे वनडेमधून स्फोटक सलामीवीर शिखर धवन याला वगळले आहे. त्याने सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट शेअर केली असून ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
शिखर धवन (Shikhar Dhawan) सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असतो. त्याने पोस्ट केलेल्या रिल्स आणि फोटो अनेकांना आवडतात. आता त्याला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून वगळले असता त्याने एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला. ज्यामध्ये तो ट्रेनिंग करताना दिसत आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, ‘हा विजय किंवा पराभवाचा विषय नाही, तो हृदयाचा आहे. काम करत राहा, देवाच्या इच्छेवर सोडून द्या.’ यानंतर धवनने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरून डिलीटही केला.
शिखरने 2010मध्ये भारताच्या वनडे संघातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर त्याने कसोटी आणि टी20मध्ये पदार्पण केले, मात्र तो सर्वाधिक वेळा वनडे संघाचाच भाग राहिला आहे. या वर्षात त्याने 22 वनडे सामने खेळले असून अनेक मालिकांमध्ये भारताने यशस्वीरित्या नेतृत्वही केले आहे. या सामन्यांमध्ये त्याने 6 अर्धशतकांच्या सहाय्याने 688 धावा केल्या आहेत. आता वनडे विश्वचषक काही महिन्यांवरच येऊन ठेपला असताना त्याला संघातून वगळणे धक्कादायक ठरत असल्याचे काहींचे म्हणणे आहे.
शिखरने यावर्षी दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यात चांगली कामगिरी केली. मात्र बांगलादेश दौऱ्यात तो धावा काढण्यात अपयशी ठरला. त्याने मागील 5 डावांमध्ये केवळ 49 धावा केल्या आहेत. यामुळे त्याला संघातून कमी केल्याचे समोर येते. त्याच्याजागी संघात इशान किशन आणि शुबमन गिल यांना संधी देण्यात आली आहे. Shikhar Dhawan Drop Indian ODI team vs Sri Lanka Instagram post goes viral
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: अरे, क्रीझवर राहा की! मिशेल स्टार्कची दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला वॉर्निंग
टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत मुकुंद शशीकुमारला वाईल्ड कार्ड प्रदान