---Advertisement---

कर्णधार ‘गब्बर’ ठरतोय माहीपेक्षाही वरचढं?, केलीये ‘या मोठ्या विक्रमाची बरोबरी

S-dhoni-Shikhar-Dhawan
---Advertisement---

सलामीवीर शिखर ८ धवनच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत क्लीन स्वीप केला. पावसाने ग्रासलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने डकवर्थ लुईस पद्धतीनुसार (DLS) विंडीज संघाचा ११९ धावांनी पराभव केला. यासह धवनने माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनीच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली.

भारताचा सलामीवीर शिखर धवनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत दमदार कामगिरी केली. धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने याच भूमीवर ३ सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजचा ३-० असा पराभव केला. पावसाने ग्रासलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने डकवर्थ लुईस पद्धतीनुसार (DLS) विंडीज संघाचा ११९ धावांनी पराभव केला. यासह धवनने माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनीच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली.

पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करत मालिका ३-० ने क्लीन स्वीप केली. भारताच्या डावातील २४ षटके पूर्ण झाल्यानंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला आणि सामना ४० षटकांचा करण्यात आला. दुसऱ्यांदा, भारतीय डावाची ३६ षटके पूर्ण झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली आणि पाहुण्या संघाचा डाव ३ बाद २२५ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर डकवर्थ लुईस पद्धतीनुसार वेस्ट इंडिजला ३५ षटकांत २५७ धावांचे लक्ष्य मिळाले आणि यजमान अवघ्या १३७ धावांत सर्वबाद झाले. कर्णधार शिखर धवनने या सामन्यात आपले ३७वे अर्धशतक झळकावले. त्याने ७४ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या. धवनने शुभमन गिल (९८*) सोबत ११३ धावांची सलामी दिली.

धोनीच्या विक्रमाची बरोबरी

यासह धवनने दोन वेळा विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली. धोनीने आशियाबाहेर २९ वेळा वनडेमध्ये ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याच्या वर रोहित शर्मा आहे ज्याने आशिया बाहेर एकदिवसीय सामन्यांमध्ये ३६ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराटने ४९ वेळा आशियाबाहेर वनडेमध्ये ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या यादीत महान फलंदाज सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ४८ वेळा असे केले तर सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने ४२ वेळा आशियाबाहेर ५० पेक्षा जास्त स्कोअर केले. माजी कर्णधार आणि सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ३८ वेळा असे केले.

गब्बर धोनीपेक्षाही वरचढं

एका बाबतीत धवनने धोनीसह इतर दिग्गजांना मागे टाकले. शिखर धवनने आता वेस्ट इंडिज संघाविरुद्ध १०१२ धावा केल्या आहेत. या प्रकरणात शिखर धवनने २ माजी कर्णधार धोनी आणि मोहम्मद अझरुद्दीन यांना मागे सोडले आहे. धोनीने १००६ आणि अझरुद्दीनने वेस्ट इंडिजविरुद्ध ९९८ धावा केल्या.

शिखर धवनच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, ३६ वर्षीय सलामीवीर आतापर्यंत एकूण ३४ कसोटी, १५५ वनडे आणि ६८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. धवनने कसोटीत ७ शतके, ५ अर्धशतकांच्या मदतीने एकूण २३१५ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने १७ शतके आणि ३७ अर्धशतके ठोकून एकूण ६४९३ धावा केल्या आहेत. गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या धवनने या फॉरमॅटमध्ये ११ अर्धशतकांच्या मदतीने १७५९ धावा केल्या आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

VIDEO। प्रेक्षकांनी कार्तिकच्या नावाने डिवचल्यावर मुरली विजय संतापला, नंतर ग्राउंडमध्ये झाला तुफान राडा

वाढदिवस विशेष- गॅरी सोबर्सबद्दल कधीही न ऐकलेल्या १० गोष्टी

आणखी एका विश्वचषकाचे यजमानपद भुषवण्यासाठी भारत सज्ज, गांगुलींनी सांगितलं ‘कधी होणार वर्ल्डकप?’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---