• About Us
  • Privacy Policy
रविवार, जानेवारी 12, 2025
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

जेव्हा गब्बरनं तुटलेल्या अंगठ्यानं ऑस्ट्रेलियाला धुतलं होतं! धवनची ही खेळी चाहते कधीच विसरणार नाहीत

शिखर धवननं एकदा अंगठ्याला दुखापत झाली असतानाही 117 धावा ठोकल्या होत्या. ही त्याची सर्वात आवडती खेळी आहे.

Pushkar Pande by Pushkar Pande
ऑगस्ट 24, 2024
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: X
(Twitter)

Photo Courtesy: X (Twitter)

शिखर धवननं आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटला अलविदा केला आहे. त्यानं आपल्या शानदार कारकिर्दीत अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या. धवननं कसोटी पदार्पणातच 187 धावांची जबरदस्त इनिंग खेळून ऑस्ट्रेलियाला नेस्तनाबूत केलं होतं.

शिखर धवनच्या अनेक खेळी चाहत्यांना कायम लक्षात आहेत. मात्र यापैकी धवनची सर्वात आवडती खेळी कोणती? शिखर धवननं स्वत: याबाबत सांगितलं आहे. ‘हिंदुस्तान टाईम्स’शी बोलताना धवननं सांगितलं की, एकदा अंगठ्याला दुखापत झाली असतानाही त्यानं 117 धावा ठोकल्या होत्या. ही त्याची सर्वात आवडती खेळी आहे.

2019 एकदिवसीय विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजमध्ये भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान होतं. या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करताना 352 अशी मोठी धावसंख्या उभारली होती. मात्र भारताच्या डावाच्या 9व्या षटकात पॅट कमिन्सनं फेकलेला चेंडू धवनच्या अंगठ्याला लागला. नंतर त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं, तरीही तो मैदानातच उभा राहिला.

त्या घटनेची आठवण करताना शिखर धवन म्हणाला, “आम्ही विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळत होतो. मी 25 धावांवर फलंदाजी करत होतो. तेव्हा माझा अंगठा फ्रॅक्चर झाला. तो चेंडू सुमारे 150 च्या वेगानं आला होता. तो थेट माझ्या अंगावर आला आणि हातावर आदळला. वेदना कमी करण्यासाठी मी गोळ्या घेतल्या आणि दुखापत असूनही मी 117 धावा केल्या.”

त्या सामन्यात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यात 127 धावांची सलामी भागीदारी झाली होती. त्यानंतर धवननं विराट कोहलीच्या साथीनं 93 धावा जोडल्या. दुखापतीमुळे धवनला हवाई शॉट्स खेळता आले नाहीत. त्यामुळे त्यानं 117 धावांच्या खेळीत एकही षटकार मारला नाही. शिखर धाववनं या खेळीत तब्बल 16 चौकार मारले. त्याची ही खेळी क्रिकेट चाहते कधीच विसरू शकणार नाहीत, हे नक्की!

हेही वाचा – 

शिखर धवनला ‘गब्बर’ नाव कसं मिळालं? टोपण नावामागची रंजक कहानी जाणून घ्या
शिखर धवनच्या कारकिर्दीत भर घालणारे हे 5 अभेद्य विक्रम, याबाबतीत सचिन-कोहलीही खूप लांब
शिखर धवन ‘मिस्टर आयसीसी’ म्हणून का प्रसिद्ध, या तीन स्पर्धा देतात प्रत्यक्षात साक्ष!

Previous Post

जय शहा आयसीसीचे अध्यक्ष झाल्यास बीसीसीआयची चिंता वाढणार; जाणून घ्या मोठं कारण

Next Post

विराट-रोहित नाही तर हा स्टार टीम इंडियाचा ‘कोहिनूर हिरा’, दिग्गज क्रिकेटपटूनं केलं काैतुक

Next Post
Jasprit-Bumrah

विराट-रोहित नाही तर हा स्टार टीम इंडियाचा 'कोहिनूर हिरा', दिग्गज क्रिकेटपटूनं केलं काैतुक

टाॅप बातम्या

  • 14 महिन्यांनतर मोहम्मद शमीचे पुनरागमन! नाही खेळणार सर्व सामने? मोठे अपडेट समोर
  • दिनेश कार्तिकने रचला इतिहास, SA20 लीग खेळणारा ठरला पहिलाच भारतीय
  • चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी रविंद्र जडेजाचे स्थान धोक्यात, माजी क्रिकेटपटूचा मोठा दावा
  • आयपीएल मेगा लिलावात अनसोल्ड ठरल्यानंतर ‘या’ 3 दिग्गजांची दमदार कामगिरी
  • मोहम्मद शमी परतला, पंतला विश्रांती! इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
  • वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी पाकिस्तान संघाची घोषणा! आफ्रिकेविरूद्धच्या पराभवानंतर संघात मोठे बदल
  • बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा पुढे का ढकलली? कारण खूप ‘गंभीर’!
  • सोलापूरच्या अर्शिन कुलकर्णीचं पदार्पणातच शतक! महाराष्ट्राची सेमीफायनलमध्ये धमाकेदार एंट्री
  • कोहलीचा ‘विराट’ विक्रम धोक्यात! यशस्वी जयस्वाल लवकरच करणार मोठा पराक्रम
  • “हा खेळाडू सचिन तेंडुलकरपेक्षाही चांगला”, ग्रेग चॅपेल यांनी केली धक्कादायक तुलना
  • विजय हजारे ट्रॉफीमध्ये भारतीय गोलंदाजाचा धुमाकूळ! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळेल का?
  • विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये शतक, ऑस्ट्रेलियात एकाच सामन्यात मिळाली होती संधी
  • न्यूझीलंडच्या खेळाडूने घेतला सूर्यकुमार यादवसारखाच झेल, टी20 वर्ल्ड कपच्या आठवणी ताज्या, पाहा VIDEO
  • फलंदाज की गोलंदाज…क्रिकेटमध्ये कोण आहे मालामाल?
  • विराट कोहलीने खरोखरच युवराज सिंगची कारकीर्द संपवली? पाहा VIDEO, काय म्हणतो युवी
  • “खेळाडूंची पूजा भारतीय क्रिकेटला मागे ढकलत आहे”, संजय मांजरेकरांचे खडे बोल
  • अश्विनच्या निवृत्तीपासून ते विराट-रोहितच्या भविष्यापर्यंत, बीसीसीआयच्या बैठकीत या मुद्द्यांवर होणार चर्चा
  • चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शुबमन गिलची जागा धोक्यात, हा खेळाडू करू शकतो टीम इंडियात धडाकेबाज एंट्री
  • इंग्लंड विरुद्धच्या मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे खेळणार नाही
  • या 3 खेळाडूंची चांदी.! वनडे मालिकानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही संधी मिळण्याची शक्यता
  • About Us
  • Privacy Policy

© 2024 Created by Digi Roister

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2024 Created by Digi Roister