मुंबई । आयपीएल२०२०च्या घोषणेनंतर भारतीय खेळाडू मैदानात परतू लागले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाज कुलदीप यादवनेही युएईमध्ये होणाऱ्या आयपीएल २०२० स्पर्धेसाठी सराव सुरू केला आहे. कुलदीपने जिममध्ये कसरत करताना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र, भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने त्याला ट्रोल केले.
कुलदीप यादवने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो दोरखंडासोबत व्यायाम करत होता. बॅकग्राऊंडला म्युझिक सुरू होते. कुलदीपचे वर्कआउट सत्र चाहत्यांना आवडले आणि कमेंट करून त्यांनी त्याचे कौतुकही केले.
शिखर धवनची मात्र यावर आणखी काही वेगळे प्रतिक्रिया होती. व्हिडीओच्या खाली टिप्पणी देताना धवननी लिहिले की, ‘भाऊ तुझ्या पसंतीस घरचे मान्यता देतील, पण तू हे सर्व करु नको.’ कुलदीपनी शिखरच्या टिप्पणीला उत्तर देताना हसणारे इमोजी पोस्ट केले. कुलदीपने नंतर हा व्हिडिओ आपल्या अकाऊंटवरुन डिलिट केला.
कुलदीपने गेल्या महिन्यापासूनच सरावास सुरुवात केली आहे. याबद्दल कुलदीप म्हणाला की, सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत क्रिकेटपटूंनाही पुढे जावे लागेल.
तो म्हणाला, ‘मी लॉकडाऊनच्या नियमाचे पालन केले. आता लॉकडाउन उघडल्यावर मी कानपूरच्या लाल बंगल्यातील रोव्हर्स ग्राऊंडवर सराव करण्यास सुरवात केली. सकाळी सात ते साडे नऊ वाजेपर्यंत माझे प्रशिक्षक कपिल पांडे यांच्याकडे माझ्या फिटनेसवर काम करतो आणि त्यानंतर संध्याकाळी चार ते संध्याकाळी आठ पर्यंत गोलंदाजीचा सराव करतो.”
महत्त्वाच्या बातम्या –
२०२२ च्या विश्वचषकात खेळणार का? झुलन गोस्वामी म्हणाली…
‘सचिनला त्रिफळाचीत करणारा माझा तो चेंडू वॉर्नपेक्षाही भारी,’ पाहा कोण म्हणतंय…
वीरेंद्र सेहवागच्या ‘या’ शतकाला झाले १८ वर्षे पूर्ण; शेअर केला खास व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख –
असे ५ खेळाडू जे आयपीएलच्या लिलावात ठरले महागडे, पण मैदनात मात्र झाले फ्लॉप…
‘जेंटल जायंट’ या नावाने प्रसिद्ध झालेला अँगस फ्रेझर
रणजी सामना खेळण्यापूर्वीच भारतीय संघात निवड झालेले दिलीप सरदेसाई