fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१०० टक्के कमबॅक करणार; दोन वर्षांपासून टीम इंडियाबाहेर असलेल्या खेळाडूची सिंहगर्जना

September 7, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

मुंबई । गेल्या दोन वर्षांपासून कसोटी संघातून बाहेर असलेला सलामीवीर शिखर धवनने भारतीय संघात पुनरागमन करण्याची आशा सोडली नाही. मिळणार्‍या संधींचा फायदा करून कसोटी संघात स्थान मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे धवनने सांगितले. सप्टेंबर 2018 मध्ये ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध 34 वर्षीय धवनने शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

धवनने एका टीव्ही चॅनेलला सांगितले की, मी कसोटी संघाचा भाग नाही, याचा अर्थ असा नाही की मी पुनरागमन करण्याची आशा सोडली आहे. तो म्हणाला, “जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मी त्याचा फायदा घेतला आहे. मागील वर्षी मी रणजी ट्रॉफीमध्ये शतक ठोकले होते आणि वनडे संघात पुनरागमन केले. मला संधी मिळाली तर मी नक्कीच ते करू शकतो.”

रोहित शर्मा, केएल राहुल, मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ या दर्जेदार खेळाडूंमुळे कसोटी संघात सलामीवीरांसाठी बरीच स्पर्धा आहे, पण हा डावखुरा फलंदाज अजूनही आशावादी आहे.  तो म्हणाला, “मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत राहीन.  पुढच्या वर्षी टी -20 विश्वचषक आहे. त्यामुळे मला सतत कामगिरी करत राहावे लागेल, स्वत: ला तंदुरुस्त ठेवावे लागेल आणि सतत धावा कराव्या लागतील. जर मी हे करण्यात यशस्वी ठरलो तर त्या गोष्टीचा मला वैयक्तिकरित्या फायदा होईल.”

धवनने आतापर्यंत  34 कसोटी सामन्यांमध्ये 40.61च्या सरासरीने 2315 धावा केल्या असून त्यात सात शतकेही केली आहेत. अजूनही तो वनडे आणि  टी -20 संघात स्थान मिळविण्यास दावेदार आहे. म्हणूनच संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार्‍या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये त्याने चांगली कामगिरी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आयापीएलमध्ये तो सध्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत आहे.


Previous Post

मुंबई इंडियन्स नंतर दिल्ली कॅपिटल्सने लाँच केली आपली नवी जर्सी; पहा कशी आहे नवी जर्सी

Next Post

भर सामन्यात राशीद खानने आंद्रे रसेलला मारली लाथ; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Related Posts

Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘काय करायचं, ही बॅटिंग लाईनअप संपतच नाही’, भारतीय दिग्गजाचा सीएसकेच्या संघाला पाहून सवाल

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘गब्बर’ची चेन्नईवर दादागिरी! धवनने घातली ‘या’ मोठ्या विक्रमला गवसणी

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला वादळी खेळीने घाम फोडणाऱ्या २१ वर्षीय पृथ्वी शॉने केली गिलची बरोबरी आता केवळ पंत आहे पुढे

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

लईच वाईट!! पहिल्याच सामन्यात एमएस धोनी क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

IPL2021: पृथ्वी शॉ आणि शिखर धवनची वादळी अर्धशतके; दिल्लीचा चेन्नईवर ७ विकेट्सने दणदणीत विजय

April 10, 2021
IPL

किती ते दुर्दैव! रैनाची अर्धशतकी तुफानी खेळी अशा पद्धतीने आली संपुष्टात, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Next Post

भर सामन्यात राशीद खानने आंद्रे रसेलला मारली लाथ; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सचिनने वादळी खेळी केलेल्या शारजावर आयपीएलचे किती सामने होणार, वाचा थोडक्यात

भारताविरुद्ध धमाकेदार द्विशतकी खेळी करणारा इंग्लंडचा हा फलंदाज झाला निवृत्त

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.