इंडियन प्रीमियर लीग २०२२च्या (आयपीएल) हंगामात पंजाब किंग्जकडून धुमाकूळ घालणारा शिखर धवन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात खोऱ्याने धावा काढल्यानंतरही त्याची मायदेशातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी निवड झालेली नाही. अशात घरी असलेला धवन घोडेस्वारीत आपला वेळ घालवताना दिसत आहे. धवनने नुकताच आपला घोडेस्वारी करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली जात आहे.
धवनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर घोडेस्वारी करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत तो घोडेस्वारीचा पुरेपूर आनंद लुटताना दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला त्याने हिंदी चित्रपटातील ‘मैं तुझे कबूल’, हे गाणे जोडले आहे. धवनने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मोहब्बत में बादशाह भी गुलाम बन जाता है.’
धवनचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या व्हिडिओला जवळपास २ लाखांपेक्षा जास्त लाईक मिळाल्या आहेत. तसेच अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काही चाहत्यांनी प्रतिक्रिया देत, ‘तू खरा नायक आहेस’, असे म्हणत धवनचे कौतुक केले आहे. धवनला घोडेस्वारीची फार आवड असून तो फावल्या वेळेत याचा आनंद लुटताना नेहमीच दिसत असतो.
https://www.instagram.com/reel/CeN8nt0ICLp/?utm_source=ig_web_copy_link
धवनने गाजवलीय यंदाची आयपीएल
पंजाब किंग्जकडून खेळताना धवनने आयपीएल २०२२ मध्ये १४ सामन्यांत ३८.३३ च्या सरासरीने ४६० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ३ अर्धशतके निघाली आहेत. तसेच त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी नाबाद ८८ धावा इतकी राहिली आहे. ही त्याची एका हंगामात ४०० पेक्षा जास्त धावा करण्याची सलग सातवी वेळ आहे.
भारतीय संघ निवकर्त्यांकडून दुर्लक्षित
असे असले तरीही, धवनला त्याच्या आयपीएलमधील चांगल्या कामगिरीनंतरही भारतीय संघात जागा मिळालेली नाही. मायदेशात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी२० मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड केली गेलेली नाही.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘आता तुझे फॉलोव्हर्स वाढले असतील’, भारतीय दिग्गजाला पोलार्डने झापले, नंतर ट्वीटही केले डिलीट
राजस्थानसाठी बटलरसह ‘या’ तीन खेळाडूंनी गाजवलीये यंदाची आयपीएल, चोपल्यात सर्वात जास्त धावा
दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधाराला दहा वर्षांपूर्वी समजलेलं कसा होणार आपला मृत्यू!