मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ मध्ये सोमवारी (२५ एप्रिल) पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात ३८ वा सामना पार पडला. हा सामना पंजाब किंग्सने ११ धावांनी जिंकत हंगामातील चौथ्या विजयाची नोंद केली. पंजाबच्या या विजयात अनुभवी सलामीवीर शिखर धवन याने नाबाद अर्धशतक करत मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे त्याचे सध्या कौतुक होत आहे. भारताच्या माजी क्रिकेटपटूने तो टी२० क्रिकेटचा खलिफा असल्याचे म्हणले आहे.
“शिखर टी२० चा खलिफा”
पंजाबकडून (Punjab Kings) सलामीला फलंदाजी करताना शिखर धवनने (Shikhar Dhawan) सोमवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ५९ चेंडूत ८८ धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने ९ चौकार आणि २ षटकार मारले. त्याच्या या खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. त्यामुळे त्याच्या या खेळीचे भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) कौतुक केले आहे.
कैफने शिखरला टी२० विश्वचषकात (T20 World Cup) खेळवायला हवे असे देखील म्हणले आहे. त्याने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘धोनी थाला आहे, कोहली किंग आहे आणि शिखर? ६००० आयपीएल धावा, दबावाच्या परिस्थितीत कामगिरी, तो टी२० क्रिकेटचा खलिफा आहे. त्याने टी२० विश्वचषकात खेळले पाहिजे. मला कुठे विचारू नका, मी जर निवडकर्ता असतो, तर मी सांगितले असते.’
दरम्यान, आगामी टी२० विश्वचषक याचवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत होणार आहे. हा विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात येणार आहे.
Dhoni Thala hai, Kohli King hain aur Shikhar? 6000 IPL runs, delivering under pressure, he is T20 ka Khalifa. He should play T20 World Cup. Don't ask me where, if I was selector, I would tell you.
— Mohammad Kaif (@MohammadKaif) April 26, 2022
शिखरच्या आयपीएलमध्ये ६००० धावा
शिखरने चेन्नईविरुद्ध नाबाद ८८ धावांची खेळी करताना आयपीएलमध्ये ६००० धावांचा (6000 IPL Runs) टप्पाही पार केला. हा टप्पा पार करणारा तो विराट कोहलीनंतरचा दुसराच खेळाडू ठरला आहे. आयपीएलमध्ये त्याने २०० सामन्यांत ३५.१८ च्या सरासरीने २ शतके आणि ४६ अर्धशतकांसह ६०८६ धावा केल्या आहेत. विराट आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने २१५ सामन्यांत ६४०२ धावा केल्या आहेत.
इतकेच नाही, तर शिखरने त्याच्या टी२० कारकिर्दीत ९००० धावा पूर्ण करण्याचाही टप्पा पार केला आहे. असा पराक्रम करणारा तो तिसराच भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी विराटने १०३९२ धावा आणि रोहितने १००४८ धावा टी२० क्रिकेटमध्ये केल्या आहेत. शिखरच्या नावावर ९०७७ टी२० धावा आहेत.
शिखरने आत्तापर्यंत आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) ८ सामन्यांमध्ये ४३.१४ च्या सरासरीने ३०२ धावा केल्या आहेत. त्याने या हंगामात २ अर्धशतक केले आहे.
पंजाबने जिंकला सामना
सोमवारी झालेल्या सामन्यात पंजाबने चेन्नईसमोर (CSK vs PBKS) शिखरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २० षटकांत ४ बाद १८७ धावा करत १८८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला २० षटकांत ६ बाद १७६ धावाच करता आल्या. चेन्नईकडून अंबाती रायुडूने ७८ धावांची खेळी केली. मात्र, अन्य कोणाला फार काही करता आले नाही. त्यामुळे पंजाबने ११ धावांनी विजय मिळवला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
खरंच भाऊ-भाऊ आहेत का ऋषी अन् शिखर धवन? वाचा काय आहे नेमकं त्यांचं नातं
चेन्नईसाठी ६ व्या पराभवानंतरही उघडे आहेत आयपीएल २०२२ प्लेऑफचे दरवाजे, जाणून घ्या समीकरण
क्रिकेटमध्ये ‘घोडेस्वारी’ सेलिब्रेशन कधी पाहिलेय का? पंजाबच्या वेगवान गोलंदाजाचा अनोखा अंदाज