दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा येत्या ९ जूनपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ बीसीसीआयकडून काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला. मात्र संघ जाहीर केल्यानंतर अनेकांनी बीसीसीआयच्या निवडप्रक्रियेवर प्रश्नचिन्हे उपस्थित केले. अनेक दिग्गज खेळाडूंना संधी न मिळाल्याने अनेकांनी बीसीसीआयवर टीका केली आहे. अशातच आता शिखर धवनला संघात स्थान न देण्यामागील धक्कादायक कारण समोर आलं आहे.
इनसाईड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, प्रशिक्षक राहुल द्रविडमुळे शिखर धवनला संघात स्थान मिळाले नाही. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, शिखर एका दशकाहून अधिक काळ भारतीय क्रिकेटमध्ये गुंतला आहे. पण टी-२० मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या तरुणांना संधी द्यावी लागेल. राहुल द्रविडला कठोर निर्णय घ्यावा लागला आणि आम्ही सर्वांनी ते मान्य केले. संघाची घोषणा करण्यापूर्वी द्रविडने धवनला याबाबत सांगितले होते.
ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषकाचे सामने होणार आहेत. म्हणजेच ही स्पर्धा सुरू होण्यास ५ महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक या युवा वेगवान गोलंदाजांना टी२० लीगसाठी निवडण्यात आलेल्या संघात प्रथमच संधी मिळाली आहे. याशिवाय कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिकचे पुनरागमन झाले आहे.
गेल्या वर्षीच्या टी२० विश्वचषकापासून पंड्या संघाबाहेर होता. पण चालू आयपीएल मोसमात त्याने कमालीची कामगिरी केली आहे. शिवाय डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवची कामगिरीही प्रभावी ठरली. उमरान मलिकने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांनाच चकित केले.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी२० मालिकेतील पहिला सामना दिल्लीत होणार आहे. अशा परिस्थितीत ज्या तरुणांना दीर्घकाळ संघात स्थान मिळवायचे आहे त्यांच्यासाठी ही मालिका महत्त्वाची आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यासाठीचा भारतीय टी२० संघ
केएल राहुल (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, उमरन मलिक, अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई.
हेही वाचा
‘फ्लाइंग कौर’ हरमनप्रितने हवेत झेपावत घेतला अप्रतिम झेल; पाहा व्हिडिओ
गुजरातच उचलणार आयपीएल ट्रॉफी? आकडेवारी देतायेत ग्वाही, तब्बल १० वेळा झालंय ‘असं’
Qualifier 1 | डेविड मिलरची ‘किलर’ खेळी! माजी टीमला रडवलं अन् गुजरातला थेट फायनलमध्ये पोहोचवलं