---Advertisement---

‘लंका दहन’ करण्यासाठी भारतीय संघ सज्ज; सराव सामन्यात ‘या’ खेळाडूंनी घातला धुमाकूळ

On: मंगळवार, जुलै 6, 2021 8:01 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात १३ जुलैपासून मर्यादीत षटकांच्या मालिका रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघ आपापसातच सराव सामना खेळत आहे. दरम्यान, नुकताच शिखर धवन इलेव्हन आणि भुवनेश्वर कुमार इलेव्हन यांच्यात टी-२० सराव सामना खेळला गेला. ज्यामध्ये भारतीय खेळाडू चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहेत.

या सराव सामन्यात मनीष पांडे धवन इलेव्हन संघाकडून खेळत होता. तर सूर्यकुमार यादव हा भुवनेश्वर कुमार इलेव्हन संघाकडून खेळत होता. दोन्ही फलंदाजांनी सराव सामन्यात गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला आहे. सूर्यकुमार यादव आणि मनीष पांडे यांनी सराव सामन्यात अर्धशतकं झळकावली आहे. ही भारतीय संघासाठी सकारात्मक बाब आहे. (Shikhar dhawan led team playes with Bhuvaneshwar kumar team intra squad match in srilanka)

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, धवन इलेव्हन संघाकडून मनीष पांडेने ४४ चेंडुंमध्ये ६३ धावांची खेळी केली. तर, ऋतुराज गायकवाडने ३० धावांची खेळी केली. याच खेळीच्या जोरावर धवन इलेव्हन संघाला २० षटक अखेर १५४ धावा करण्यात यश आले होते.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भुवनेश्वर इलेव्हन संघाकडून सलामी फलंदाज पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडीक्कल यांनी संघाला जोरदार सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून ६० धावा जोडल्या. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सूर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले. धवन इलेव्हनने दिलेले आव्हान भुवनेश्वर इलेव्हनने अवघ्या १७ षटकातच पूर्ण केले होते.

श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका होणार आहे. सध्या भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्याने श्रीलंका दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या मर्यादीत षटकांच्या भारतीय संघात अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला नाही. श्रीलंका दौऱ्यासाठी विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या अनुपस्थितीत शिखर धवनला कर्णधारपदाची आणि भुवनेश्वर कुमारकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच काही युवा खेळाडूंनाही संघात स्थान मिळाले आहे.

असे असेल भारत विरुद्ध श्रीलंका मालिकांचे वेळापत्रक
वनडे मालिका 
१)पहिला वनडे सामना – १३ जुलै
२) दुसरा वनडे सामना – १६ जुलै
३) तिसरा वनडे सामना – १८ जुलै

टी-२० मालिका
१) पहिला टी – २०सामना – २१ जुलै
२) दुसरा टी-२० सामना – २२ जुलै
३) तिसरा टी -२० सामना – २५ जुलै

असा आहे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.
नेट गोलंदाज : ईशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर, सिमरनजीत सिंग

महत्त्वाच्या बातम्या – 

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी ‘ही’ आहे आनंदाची बातमी

इंग्लंड आणि श्रीलंका दौऱ्यांमध्ये अडकला पृथ्वी शॉ, माजी क्रिकेटपटू जाफरने शेअर केलेले ‘ते’ मीम जोरदार व्हायरल

श्रीलंका क्रिकेटमधील दुष्टचक्र थांबेना, आता सापडले मॅच फिक्सिंगच्या विळख्यात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---