---Advertisement---

धवनच्या दुखापतीबाबत फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांचा मोठा खूलासा, पंतबद्दलही केले भाष्य

On: बुधवार, जून 12, 2019 8:52 PM
---Advertisement---

भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला रविवारी(9 जून) 2019 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना डाव्या अंगठ्याची दुखापत झाली आहे. या सामन्यात फलंदाजी करत असताना त्याला पॅट कमिन्सने टाकलेला एक चेंडू लागला होता. त्यामुळे त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले आहे.

त्यामुळे भारतीय संघाने त्याच्यासाठी राखीव खेळाडू म्हणून युवा यष्टीरक्षक रिषभ पंतला इंग्लंडमध्ये बोलावून घेतले आहे. असे असले तरी पंतला शिखरचा बदली खेळाडू म्हणून अजून घोषित केलेले नाही.

शिखर सध्या भारतीय संघाच्या मेडिकल टिमच्या आणि संघ व्यवस्थापनाच्या निरिक्षणाखाली असून त्याला 10 ते 12 दिवसांचा कालावधी या दुखापतीतून बरा होण्यासाठी लागणार आहे. त्यामुळे त्यानंतरच शिखरबद्दल निर्णय घेतला जाईल. याबद्दल भारताचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी माहिती दिली आहे.

भारताचा उद्या(13 जून) न्यूझीलंड विरुद्ध या विश्वचषकातील तिसरा सामना होणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंधेला बांगर यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.

यावेळी त्यांनी शिखर सारख्या महत्त्वाच्या खेळाडूला दुखापत झाल्यानंतर लगेचच विश्वचषकातून बाहेर काढण्याचा निर्णय घेणे कठिण असल्याचे म्हटले आहे. तसेच ते 10 ते 12 दिवस शिखर दुखापतीतून सावरण्याची वाट पाहतील असे सांगितले आहे.

बांगर म्हणाले, ’10-12 दिवसांनंतर आम्ही शिखरच्या दुखापतीबद्दल निर्णय घेऊ. तोपर्यंत जर कधी आम्हाला बदली खेळाडूची गरज लागली, मी पुन्हा सांगतो मी जर कधी असे म्हणत आहे, तर राखीव खेळाडूने(पंत) संघाबरोबर काही दिवस सराव करणे नेहमीच चांगले आहे. तो(पंत) मधल्या फळीत फलंदाजी करतो आणि तो डावकरी असल्याने भारताला मदत होईल.’

याबरोबरच बांगर यांनी शिखरच्या अनुपस्थितीत केएल राहुल रोहित शर्मासह सलामीला उतरेल असे स्पष्ट केले आहे. तसेच भारताकडे चौथ्या क्रमांकासाठी अनेक पर्याय असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

भारताचा न्यूझीलंड विरुद्धचा सामना नॉटिंगहॅम येथे उद्या ट्रेंट ब्रिज मैदानावर पार पडणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

स्मिथची पाठराखण करणे कोहलीला महागात, या खेळाडूने केली सडकून टीका

या कारणामुळे विश्वचषकात पावसामुळे सामना रद्द झाल्यावर नाही राखीव दिवस

जेमतेम १८ वर्षीय मुंबईकर खेळाडूची किया सुपर लीगमध्ये निवड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment