भारतीय क्रिकेट संघाचा धाकड फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्यासाठी गेले काही महिने चांगले राहिलेले नाहीत. क्रिकेट कारकिर्दीतील चढ-उतारांबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही बऱ्याच समस्या उद्भवल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या टी२० विश्वचषक २०२१ साठी भारतीय संघात त्याची निवड केली गेली नव्हती. त्यानंतर त्याची पत्नी आयेशा मुखर्जी हिनेही त्याला घटस्फोट देत मोठा धक्का दिला होता. यानंतर धवन स्वत:ला इतर गोष्टीत रमवून यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय. अशात त्याला त्याचा मुलगा जोरावर (Zoravar Dhawan) याची खूप आठवण येताना दिसते आहे.
धवन नेहमीच आपल्या ७ वर्षीय मुलासोबत मजा-मस्ती करत असतो. यादरम्यानचे फोटोही तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकताच त्याने आपला मुलगा जोरावरसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद (Talk On Video Call) साधल्याचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये वडील आणि मुलाची ही जोडी एकमेकांची हेयरस्टाईल दाखवताना दिसत आहेत. त्यांची दोघांचीही हेयरस्टाईल अगदी हुबेहूब असल्याचे फोटोत दिसते आहे.
हा फोटो शेअर करत धवनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘जसे वडील, तसा मुलगा, बाळा मला तुझी खूप आठवण येते आहे.’
https://www.instagram.com/p/CXTZcsBgAgu/?utm_medium=copy_link
लग्नाच्या ९ वर्षांनंतर घेतला घटस्फोट
दरम्यान धवन आणि आयेशा यांचे २०१२ साली लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या ९ वर्षांनंतर त्यांनी घटस्पोट घेतला आहे. आयेशाचे धवनबरोबरच दुसरे लग्न होते. यापूर्वीही तिचा एकदा घटस्पोट झाला आहे. तिला धवनबरोबर लग्न करण्यावेळी दोन मुलीही होत्या. या दोन मुलींचाही धवनने स्विकार केला होता.
आयेशा गेल्या अनेक वर्षांपासून ऑस्ट्रेलियामध्ये राहाते, त्यामुळे शिखर वेळ मिळेल तेव्हा ऑस्ट्रेलियाला जायचा किंवा आयेशा भारतात यायची.
नातं तुटल्याची होती चर्चा
शिखर आणि आयेशा यांच्यात दुरावा आल्याची चर्चा गेल्या वर्षीपासून सुरु होती. कारण, दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं होतं. तसेच त्यांनी एकमेकांबरोबरील पोस्ट टाकणंही बंद केलं होतं. इतकंच नाही, तर आयेशाने इंस्टाग्रामवर तिचे दुसरे अकाउंटही चालू केले होते.
याबरोबर आयेशाची मोठी मुलगी आलियाने देखील शिखर बरोबरील इंस्टाग्रामवर पोस्ट केलेले फोटो डिलिट केले होते. त्याचबरोबर मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी शिखर गेल्यावर्षी जेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्याला गेला होता, त्यावेळीही तो घरी न जाता थेट भारतात परतला होता. विशेष म्हणजे २२ डिसेंबरला त्याच्या मुलाचा जोरावरचा वाढदिवस होता. असे असतानाही तो घरी गेला नसल्याची चर्चा होती. या सर्व घडामोडींमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून त्याचे आणि आयेशा यांचे नाते बिघडल्याची चर्चा होती.
महत्त्वाच्या बातम्या-
ऋतुराजची शतकांची हॅट्रिक! महाराष्ट्राचे नेतृत्त्व करताना विजय हजारे ट्रॉफीत पाडलाय धावांचा पाऊस
गॅबा कसोटीत ८९ धावांची खेळी करणाऱ्या रुटची पाँटिंगशी बरोबरी, आता नजर क्लार्कच्या विक्रमावर
गॅबा कसोटीचे अचानक बंद झाले जगभरातील लाईव्ह टेलिकास्ट, डीआरएस ठप्प; वाचा सविस्तर