---Advertisement---

शिखर धवनला आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1000 धावा करण्याची संधी

On: रविवार, जुलै 8, 2018 5:41 PM
---Advertisement---

ब्रिस्टल। भारत विरुद्ध इंग्लंड संघात रविवारी 8 जुलैला तिसरा आणि निर्णायक सामना होणार आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला आंतरराष्ट्रीय टी20मध्ये1000 धावा करण्याची संधी आहे.

यासाठी शिखरला फक्त 28 धावांची गरज आहे. जर त्याने या सामन्यात आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1000 धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला तर तो असे करणारा भारताचा सहावा खेळाडू बनेल.

भारताकडून याआधी विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना, एमएस धोनी आणि युवराज सिंग यांनी आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1000 धावा केल्या आहेत.

शिखर मागील काही सामन्यांपासून चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 39 सामन्यात 7 अर्धशतकांसह 972 धावा केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू:

2059 धावा – विराट कोहली (61 सामने)

1986 धावा – रोहित शर्मा (83 सामने)

1605 धावा – सुरेश रैना (77 सामने)

1487 धावा – एमएस धोनी (92 सामने)

1177 धावा – युवराज सिंग (58 सामने)

972 धावा – शिखर धवन (39 सामने)

महत्त्वाच्या बातम्या:

-Video: कोण आहे तो दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू; जो गातो हिंदी कव्वाली!

-रोहित शर्माला मागील तीन सामन्यात हुलकावणी देणारा विक्रम आज करण्याची संधी

-जेव्हा गांगुलीने ‘वॉटरबॉय’ बनण्यास दिला होता नकार…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment