बंगळूरु। आज(22 सप्टेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात एम चिन्नास्वामी स्टेडीयमवर तिसरा आणि शेवटचा टी20 सामना पार पडणार आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला एक खास विक्रम करण्याची संधी आहे.
या सामन्यात शिखरने 4 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये(सर्व टी20 स्पर्धा) 7000 हजारांचा टप्पा पार करेल. तसेच हा टप्पा पार करणारा एकूण 15 वा खेळाडू तर भारताचा 4 था फलंदाज ठरेल.
याआधी भारताच्या विराट कोहली, रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांनी हा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे या तिघांनीही ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये 8000 धावांचा टप्पाही पार केला आहे.
शिखरच्या सध्या ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये 247 सामन्यात 31.94 च्या सरासरीने 6996 धावा आहेत. यामध्ये त्याच्या 53 अर्धशतकांचा समावेश आहे.
तसेच सध्या ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये विराट कोहली अव्वल क्रमांकावर आहे. त्याने 270 सामन्यात 40.89च्या सरासरीने 8547 धावा केल्या आहेत.
तसेच टी20 क्रिकेटमध्ये जगातील एकूण क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक धावा ख्रिस गेलने केल्या आहेत. त्याने 391 सामन्यात 38.86 च्या सरासरीने 13021 धावा केल्या आहेत.
ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू –
8547 धावा – विराट कोहली (270 सामने)
8392 धावा – सुरेश रैना (319 सामने)
8303 धावा – रोहित शर्मा (317 सामने)
6996 धावा – शिखर धवन (247 सामने)
6621 धावा – एमएस धोनी (317 सामने)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–टीम इंडियाच्या टी२० संघात संधी न मिळाल्याबद्दल कुलदीप यादव म्हणाला…
–धोनी की पॉटिंग, कोण आहे आवडता कर्णधार? ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाने दिले हे उत्तर
–या कारणामुळे भारतात कसोटी खेळण्यासाठी येताना भडकला फाफ डू प्लेसिस