---Advertisement---

या खास यादीत समावेश होण्यासाठी शिखर धवन केवळ ४४ धावा दूर

---Advertisement---

आज(18 सप्टेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात मोहालीमध्ये दुसरा टी20 सामना होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला एक खास विक्रम करण्याची संधी आहे.

या सामन्यात शिखरने 44 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये(सर्व टी20 स्पर्धा) 7000 हजारांचा टप्पा पार करेल. तसेच हा टप्पा पार करणारा एकूण 15 वा खेळाडू तर भारताचा 4 था फलंदाज ठरेल.

याआधी भारताच्या विराट कोहली, रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांनी हा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे या तिघांनीही ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये 8000 धावांचा टप्पाही पार केला आहे.

शिखरच्या सध्या ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये 246 सामन्यात 31.90 च्या सरासरीने 6956 धावा आहेत. यामध्ये त्याच्या 53 अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच सध्या ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये विराट कोहली अव्वल क्रमांकावर आहे. त्याने 269 सामन्यात 40.55 च्या सरासरीने 8475 धावा केल्या आहेत.

ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू –

8475 धावा  – विराट कोहली (269 सामने)

8392 धावा – सुरेश रैना (319 सामने)

8291 धावा – रोहित शर्मा (316 सामने)

6956 धावा – शिखर धवन (246 सामने)

6621 धावा – एमएस धोनी (317 सामने)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

कोहली-स्मिथ कोण आहे सर्वोत्तम फलंदाज? जॉन्टी ऱ्होड्सने घेतले ‘हे’ नाव

टीम इंडियाकडून २००३च्या विश्वचषकात खेळलेल्या या खेळाडूने घेतली निवृत्ती

फिक्सिंग प्रकरणाबाबत कोहली-धोनीबद्दल एसीयू प्रमुखांनी केले मोठे भाष्य, म्हणाले…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment