---Advertisement---

कॅप्टन्सी गमावल्यानंतर प्रथमच बोलला शिखर; म्हणाला, “राहुल हा…”

SHIKHAR WI
---Advertisement---

आशिया चषकापूर्वी भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघात अनेक दिग्गजांना विश्रांती देण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी संघ जाहीर झाला तेव्हा शिखर धवनकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. धवन याआधी वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत संघाचा कर्णधार होता. त्यानंतर, केएल राहुल दुखापतीतून परतताच धवनचे कर्णधारपद काढून घेत राहुलला कर्णधार बनवण्यात आले. आता या संपूर्ण प्रकरणावर स्वतः शिखरने प्रतिक्रिया दिली आहे.

मालिकेच्या आधी पत्रकारांशी संवाद साधताना शिखर धवनने अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. केएल राहुलविषयी बोलताना म्हणाला,
“ही खूप चांगली बातमी आहे की केएल संघात परतला आहे. इतकेच नव्हेतर संघाचे नेतृत्वही करतोय. तो या भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. आशिया चषक सुरू होण्यापूर्वी त्याच्यासाठी ही तयारीची चांगली संधी असेल. मला खात्री आहे की, या दौऱ्याचा त्याला खूप फायदा होईल.”

याचवेळी शिखरने आपल्या अनुभवाचा फायदा आपण संघाला करून देण्यासाठी कधीही तयार असल्याची ग्वाही दिली. तसेच, झिम्बाब्वेला आपण अजिबात हलक्यात घेणार नसल्याचे देखील म्हटले. सोबतच, जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या झिम्बाब्वेच्या सिकंदर रझा याचे देखील कौतुक केले. उभय संघातील ही तीन सामन्यांची वनडे मालिका १८ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या कालावधीत पार पडेल.

झिम्बाब्वेविरुद्धच्या ३ वनडे सामन्यांसाठी भारताचा संघ:
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर , कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाज अहमद.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---