भारतीय क्रिकेट संघ पुढील काही दिवसांत दोन महत्त्वाच्या मालिका खेळणार आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय संघाला तीन वनडे सामन्यांची मालिका खेळायची. त्यानंतर २७ ऑगस्टपासून आशिया चषक खेळला जाईल. या दोन्ही स्पर्धांसाठी दोन वेगवेगळे संघ खेळणार आहेत. भारताचे दोन अनुभवी सलामीवीर शिखर धवन व कर्णधार रोहित शर्मा हे एकत्रित खेळणार नाहीत. त्याचवेळी शिखर धवन याने आपल्या व रोहित शर्माच्या नात्याविषयी महत्त्वाचे विधान केले आहे.
शिखर धवन मागील काही काळापासून भारतीय टी२० संघाचा भाग नाही. आशिया चषकासाठी देखील त्याचा विचार केला गेला नाही. तसेच, आगामी टी२० विश्वचषकासाठीही त्याची निवड होण्याची शक्यता नाही. शिखरने नुकतीच एक मुलाखत दिली. त्यामध्ये त्याने अनेक मुद्द्यांवर आपली मते मांडली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा व त्याचा सलामीचा साथीदार रोहित शर्मा याच्याविषयी विचारलेले एका प्रश्नावर बोलताना त्याने मन जिंकणारे उत्तर दिले. तो म्हणाला,
“रोहित आणि माझ्यामध्ये एक चांगली बॉंडींग आणि मैत्री आहे. आम्ही कित्येक वर्षांपासून एकत्रित खेळत आहोत. आम्ही दोघे एकमेकांना चांगल्या पद्धतीने समजून घेतो. त्यामुळेच आम्ही आमचा खेळ बदलतो. आम्ही एकमेकांना चांगला पाठिंबा देत आलो आहोत. तो माझ्यामते सर्वोत्तम सलामीचा जोडीदार आहे.”
शिखरला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. मात्र, दुखापतीतून सावरल्यानंतर अचानक केएल राहुलला संघाचे कर्णधार बनवण्यात आले आहे. धवन उपकर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडेल. सोबतच वनडे संघातील आपली जागा आणखी मजबूत करण्यासाठी तो प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
अखेर अफगाणिस्तानच्या हाती यश, आयर्लंडविरुद्ध सलग २ टी२० पराभवांनंतर उघडले खाते
एशिया कपमध्ये रोहित ठरणार ‘हिट’मॅन! एकाहून एक बड्या विक्रमांचे रचणार मनोरे
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नियम अधिक कडक! आता खेळाडूंना सोसावा लागणार भुर्दंड






