शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने वेस्ट इंडिजला ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत क्लिन स्वीप केले. बुधवारी (२८ जुलै) झालेल्या तिसऱ्या व अखेरच्या वनडे सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमाअंतर्गत वेस्ट इंडिजला ११९ धावांच्या फरकाने पराभूत केले. या सामन्यासह भारतीय संघाने वेस्ट इंडिजला वनडे मालिकेत ३-० ने पराभवाची धूळ चारली. या शानदार विजयानंतरही कर्णधार धवन नाखुश आहे.
धवनला (Shikhar Dhawan) भारतीय सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) याचे शतक हुकल्याचे वाईट (Shubman Gill’s Century) वाटत आहे. गिलने तिसऱ्या वनडे सामन्यात शानदार खेळी केली. परंतु पावसामुळे फक्त २ धावांनी त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक हुकले आहे. पावसामुळे भारतीय संघाचा डाव अर्ध्यातच थांबवण्यात आला आणि ३६ षटकांमध्येच ३ बाद २२५ धावा अशा स्थितीत असताना भारतीय संघाचा डाव संपवण्यात आला. यामुळे गिलला ९८ धावांवर माघारी परतावे लागले.
९८ चेंडूत २ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ९८ धावा करत गिल नाबाद राहिला. या शानदार खेळीच्या जोरावर तो अखेरच्या सामन्यातील सामनावीर बनला. तसेच मालिकावीराचा पुरस्कारही त्यानेच पटकावला. परंतु त्याच्या अधुऱ्या शतकाबद्दल धवनला वाईट वाटत आहे.
याबद्दल तिसऱ्या वनडे सामन्यानंतर बोलताना धवन म्हणाला की, “मला जाणीव आहे की, संघातील मुले खूप युवा आहेत. परंतु ते एका अनुभवी खेळाडूसारखेच आहेत. मैदानावर कठिण परिस्थिती ओढावल्यानंतर त्यातून बाहेर कसे निघायचे हे त्यांनी शिकले आहे. ही आमच्यासाठी चांगली बाब आहे. मी माझ्या फॉर्ममुळे थोडा खुशदेखील आहे. मी या क्रिकेट स्वरूपात दीर्घ काळापासून खेळत आहे. मी माझ्या प्रदर्शनाने खुश आहे.”
शुबमन गिलची खेळी पाहण्यासारखी होती
गिलच्या खेळीबद्दल पुढे बोलताना धवन म्हणाला की, “ज्या पद्धतीने गिलने ९८ धावांची खेळी खेळली आहे, ते पाहण्यासारखे होते. बाकी युवा खेळाडूंनीही अद्भुत खेळ दाखवला आहे. गिलसाठी जरा वाईटही वाटत आहे. परंतु क्रिकेटमध्ये बऱ्याचदा असे होत असते. परंतु त्याने ज्या प्रकारे त्याची खेळी साकारली, ती कौतुकास्पद होती. भारतीय संघाचे गोलंदाज मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल आणि शार्दुल ठाकूर यांनीही त्यांचे शंभर टक्के योगदान दिले आहे.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वनडे क्रिकेट धोक्यात? आता थेट आयसीसीने दिले स्पष्टीकरण
तुफान फॉर्मात अससेल्या आझमची ‘या’ नवख्या गोलंदाजापुढे होतेय सिट्टी पिट्टी गुल, बघा कोण आहे तो?
त्रिनिदादमध्ये भारताचे जास्त सामने घेतल्याने संतापला कॅरेबियन दिग्गज; म्हणाला, “काय गरज होती ?”