भारत आणि इंग्लंड यांच्यात येत्या १२ मार्चपासून पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका सुरू होणार आहे. ही मालिका टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने देखील महत्त्वाची असणार आहे. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी-२० विश्वचषक स्पर्धा भारतातच खेळवण्यात येणार आहे. तसेच भारतीय संघासमोर पहिल्या टी-२० सामन्यात रोहित सोबत सलामीला फलंदाजी कोण करणार हा मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर स्वतः रोहित शर्माने दिले आहे.
टी२० मालिकेसाठी भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तसेच सलामीसाठी संघात रोहित शर्मा सोबत शिखर धवन आणि केएल राहुल यांना संधी देण्यात आली आहे. याबाबत रोहितला प्रश्न विचारण्यात आला होता की, भारतीय संघाच्या सलामी जोडीत कोण असेल. यावर रोहित म्हणाला,” आम्ही आमच्या जोडीचे नाव आता नाही सांगू शकत, तुम्हाला शुक्रवार पर्यंत वाट पाहावी लागेल.”
विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर टी२० मालिका खेळवण्यात येणार आहे. तसेच १२ मार्चला सुरु होणाऱ्या पहिल्या टी -२० सामन्यापूर्वी रोहित शर्माने म्हटले की, “आम्ही या मालिकेला कुठल्याही प्रकारची सराव मालिका समजत नाही. आम्ही फक्त मालिका जिंकण्याचा विचार करत आहोत.”
तसेच तो पुढे म्हणाला,” आम्ही जर वर्तमानाचा विचार केला तर भविष्यात नक्की आमचे चांगले होणार. ही एक मोठी मालिका आहे. हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की आम्ही एक संघ म्हणून आणि खेळाडू म्हणून कुठल्या स्थितीत आहोत.”
संघाला चांगली सुरुवात करून देणे असेल लक्ष्य
रोहित शर्माने म्हटले, “जर मी प्रथम फलंदाजी करत असेल तर मी संघाला नक्की चांगली सुरुवात करून द्यायचा विचार करेल, माझ्यासाठी काहीच बदलले नाहीये. धावांचा पाठलाग करताना पद्धत तीच असेल फक्त मानसिकता बदललेली असेल. कारण आम्हाला खूप गोष्टींचे नियोजन करावे लागते.”
महत्त्वाच्या बातम्या –
‘असे’ झाले तर विराटची टीम इंडिया बनू शकते क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील अव्वल संघ