---Advertisement---

लाॅकडाऊनमध्ये शिखर धवन ९९ धावांवर बाद, शतकी खेळीचे स्वप्न भंगले

On: शुक्रवार, एप्रिल 24, 2020 6:58 PM
---Advertisement---

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे क्रिकेटच्या स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. अशामध्ये खेळाडूंना सरावासाठी घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे ते आपापल्या घरात वेळ घालवत आहेत. परंतु भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन चक्क आपल्या परिवारासोबत आपल्या घरात सराव करत आहे.

आपल्या घरात सराव करतानाचा व्हिडिओ धवनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शन दिले आहे की, “क्वारंटाईन प्रीमियर लीगचा सर्वात आकर्षक क्षण, धवन विरुद्ध धवन.”

https://www.instagram.com/p/B_SclEaDu7Z/?utm_source=ig_web_copy_link

 

या व्हिडिओत धवनचा मुलगा झोरावर आपल्या वडिलांना गोलंदाजी करत आहे. ज्यूनियर धवनच्या चेंडूला धवन अडवण्याचा प्रयत्न करत आहे. पुढच्या चेंडूवर तो एका बाजूला ड्राईव्ह खेळतो. यानंतर धवन आणि ज्यूनियर धवन म्हणजेच झोरावरमध्ये वातावरण तापलेलं दिसते.

पुढे धवन ९९ धावांवर फलंदाजी करत असतो. तेवढ्यात ज्यूनियर धवन त्याला त्रिफळाचीत करतो. असे बॅकग्राऊंडमध्ये सुरु असलेल्या समालोचनामध्ये ऐकायला मिळत आहे. या व्हिडिओत समालोचनाबरोबरच प्रेक्षकांच्या आवाजाचाही समावेश करण्यात आला आहे.

मागील आठवड्यात धवनने आपल्या मुलाबरोबरचा एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये धवन आणि त्याचा मुलगा बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना दिसत होते.

https://www.instagram.com/p/B_DHFh-D79R/?utm_source=ig_web_copy_link

धवनने भारताकडून आतापर्यंत ३४ कसोटी सामने, १३६ वनडे सामने आणि ६१ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये कसोटीत त्याने ४०.६१ च्या सरासरीने २३१५ धावा केल्या आहेत. त्यात ५ अर्धशतके आणि ७ शतकांचा समावेश आहे.

तसेच वनडेत धवनने ४५.१४ च्या सरासरीने ५६८८ धावा केल्या आहेत. त्यात १७ शतके आणि २९ अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी२०त २८.३५ च्या सरासरीने १५८८ धावा केल्या आहेत. यात १० अर्धशतकांचा समावेश आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-़

-या संघाने पाहिले आहेत आयपीएल फायनलमध्ये सर्वाधिक पराभव

-आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज शेन वॉर्नने बड्डे बॉय सचिनचा घेतला ऑटोग्राफ

-एवढंच वाटतं तर थेट आपल्या गाडीने रांचीला जाऊन निवृत्तीबद्दल धोनीलाच विचारा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---