---Advertisement---

बेटे शेर हो तुम, मौज कर दी..! विजयानंतर धवनकडून शॉचे विशेष अंदाजात कौतुक, पाहा धमाल व्हिडिओ 

On: रविवार, एप्रिल 11, 2021 11:57 AM
---Advertisement---

आयपीएल 2021 च्या दुसर्‍या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचे सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी अतुलनीय कामगिरी केली. सामनावीर ठरलेल्या धवनने 54 चेंडूत 85 धावा केल्या; तर शॉने केवळ 38 चेंडूत 72 धावा कुटल्या. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी 81 चेंडूत 138 धावांची भागीदारी केली. त्यांच्या या विस्फोटक खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जला सात गडी राखून सहज पराभूत केले. विजयानंतर दोन्ही खेळाडूंनी मैदानावर आणि ड्रेसिंग रूममध्ये जोरदार धमाल केली. यामध्ये धवन आणि शॉ यांनी एकत्र डान्सही केला आहे.

या सामन्यानंतर शिखर धवनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये तो शॉबरोबर मस्ती करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ‘बेटे तुने तो मौज कर दी’ हे गाणे ऐकू येत आहे. तसेच धवनने पोस्टच्या खाली ‘बेटे.. शेर हो तुम.. मौज कर दी..’ असे लिहले आहे.

या व्हिडिओमध्ये धवन प्रथम शॉचे गाल खेचत आहे आणि नंतर त्याला उचलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तत्पूर्वी सामना संपल्यानंतर धवनने शॉची मुलाखत घेतली तेव्हा ते दोघे ठुमके मारताना दिसले होते.

या सामन्यानंतर धवन म्हणाला की, “मी आज माझ्या फलंदाजीचा खूप आनंद लुटला, पृथ्वीनेही आज शानदार फलंदाजी केली. विजय हजारे स्पर्धेपासून त्याने आपल्या खेळीत सातत्यता ठेवली आहे. आम्हाला या सामन्यात चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती. कारण समोर खूप मोठे लक्ष्य होते. तसेच मागील आयपीएल सत्र पृथ्वीसाठी खास राहिले नसल्याने त्याला खेळताना पाहून खूप छान वाटले.”

https://www.instagram.com/p/CNfvCt4j1P4/?utm_source=ig_web_button_share_sheet

तसेच सामना संपल्यानंतर शॉ म्हणाला की, “आमचा विजय झाल्यामुळे खूप भारी वाटत आहे. या विजयामध्ये प्रत्येकाने मोलाचे योगदान दिले. दुसऱ्या डावात फलंदाजीचा निर्णय चांगला होता. कारण चेंडू बॅटवर येत होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी संघाबाहेर झाल्यानंतर मी प्रवीण आमरे सरांकडे गेलो आणि माझ्या फलंदाजीविषयी चर्चा केली. त्यानंतर मी काही देशांतर्गत सामने खेळले ज्याचा मला खूप फायदा झाला. मी पुनरागमन करू शकलो याचा मला खूप आनंद होत आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

काय सांगता! ग्लेन मॅक्सवेलला लिलावापूर्वीच देण्यात आली होती आरसीबीची कॅप; विराटचा गौप्यस्फोट

CSKvDC: खराब क्षेत्ररक्षण ते विकेट्सची कमी, ‘ही’ आहेत चेन्नई सुपर किंग्जच्या पराभवाची कारणे

बलाढ्य चेन्नईवर मात करण्यात ‘या’ खेळाडूंनी उचलला खारीचा वाटा; पाहा दिल्लीच्या विजयाचे नायक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---