---Advertisement---

रोहित खरा ‘यारों का यार’! शिखरने केली हिटमॅनची मोकळ्या मनाने स्तुती

On: शुक्रवार, एप्रिल 7, 2023 4:28 PM
Rohit-Sharma-Shikhar-Dhawan
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन हा सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. अगदी काही महिन्यांपूर्वी भारतीय वनडे संघाचे नेतृत्व करत असलेला शिखर तीनही प्रकारच्या क्रिकेट संघाचा भाग नाही. सध्या तो आयपीएलच्या सोळाव्या हंगामात पंजाब किंग्सचे नेतृत्व करताना दिसतोय. नेतृत्वात संघाने पहिले दोनही सामने आरामात जिंकले आहेत. त्याचवेळी त्याने एक मुलाखत दिली. यामध्ये त्याने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचे विशेष कौतुक केले.

खराब कामगिरीमुळे राष्ट्रीय संघातून बाहेर झाल्यानंतर शिखर आयपीएलमधून भारतीय संघात पुनरागमनाचा प्रयत्न करेल. हंगामातील पहिल्या दोन सामन्यात त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद  86 धावांची खेळी केली होती. यानंतर त्याने एका मुलाखतीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा हा एक उत्तम व्यक्ती असल्याचे म्हटले. शिखर म्हणाला,

“रोहित शर्मा हा खेळाडू म्हणून दर्जेदार आहेच. मात्र, एक व्यक्ती म्हणून देखील तो एखाद्या रत्नासारखा वाटतो. तो मनाने साफ असून, मैत्री देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने निभावतो. अगदी ‘यारो का यार’ त्याला म्हणता येईल. तो नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर राहिला आहे.”

शिखरने यापूर्वी देखील आपल्याला रोहित शर्मा व प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पुरेशी संधी दिल्याचे म्हटले होते.

भारतीय संघाला चालू वर्षी वनडे विश्वचषक खेळायचा आहे. या विश्वचषकासाठी संघात पुनरागमन करण्याचा मनोदय देखील त्याने बोलून दाखवला. सध्या भारतीय संघात सलामीला कर्णधार रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी जागा पक्की केली आहे. तरी तिसरा सलामीवीर म्हणून अद्याप जागा रिक्त असल्याचे दिसून येते.

(Shikhar Dhawan Praised Rohit Sharma Again)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

विजयानंतर KKRची गरुडझेप! पॉइंट्स टेबलमध्ये RCBला जबर धक्का, तिसऱ्या स्थानावरून थेट ‘या’ स्थानी घसरण
आयपीएल सुरू असताना वाढल्या पृथ्वी शॉच्या अडचणी! सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सरने केले आरोप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---