कोलकाता । भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आपल्या जीवनातील आणखी एक इंनिंग लवकरच सुरु करणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी भुवनेश्वर कुमार मेरठ शहरात प्रेयसी नुपूरसोबत लग्न बंधनात अडकणार आहे.
काल सामना संपल्यावर सलामीवीर शिखर धवनने भुवीबरोबर एक खास सेल्फी विडिओ शेअर करत तो लवकरच जोरू का गुलाम बनणार असल्याचे म्हटले आहे.
यात शिखर म्हणतो, “काय मित्रांनो कसे आहात? आमचा मित्र उद्या जोरू का गुलाम बनणार आहे. तो माझ्यासमोर बसला आहे तर आपण त्याला विचारू की त्याला कस वाटत आहे? मोतीचूरचा लाडू जो खातो त्याला पण पश्चाताप होतो आणि जो खात नाही त्यालाही.”
भूवी यावर म्हणतो, “माहित नाही तयारी कशी सुरु आहे. जे केलय ते घरच्यांनी केलंय. मी आज तर कसोटी सामना खेळून थकलो आहे. आज मी घरी जाईल. माहित नाही घरी गेल्यावर माझ्या भावना कशा असतील. परंतु संघातील लग्न झालेल्या लोकांच्या मते लग्नात खूप मजा येते.”
यावर शिखर म्हणतो, ” मला वाटतं आहे की तू आताच जोरू का गुलाम बनला आहे यावर काय म्हणशील भुवी?” तर हजरजवाबी शिखर म्हणतो,” याला प्रेम म्हणतात. ”
https://www.instagram.com/p/BbuBnXzhpfb/