भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज शिखर धवनला शनिवारी (१३ नोव्हेंबर) २०२१ सालच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याला हा पुरस्कार त्याचे भारतीय क्रिकेटमधील महत्वाचे योगदान पाहून दिला गेला आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर शिखर धवनने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
तो म्हणाला की, हा त्याच्यासाठी खूप मोठा सन्मान आहे आणि त्याने त्याचे प्रशिक्षक, मेडिकल स्टाफ, सपोर्ट स्टाफ, बीसीसीआय, त्याचे कुटुंब आणि मित्रांचे या प्रवासात कायम सोबत राहण्यासाठी आभार मानले आहेत.
धवनने हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर एक खास पोस्ट केली आहे. त्याने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “अर्जुन पुरस्कार मिळवणे माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. मी त्या सर्वांचे आभार मानू इच्छितो, जे या प्रवासात माझ्या सोबत होते – माझे प्रशिक्षक, डॉक्टर, सपोर्ट स्टाफ, बीसीसीआय, संघातील सहकारी, सर्व चाहते, माझे मित्र आणि माझे कुटुंब. तुम्हा सर्वाचे प्रेम आणि साथीशिवाय हे शक्य होऊ शकले नसते. हा एक खूपच अविश्वसनीय अनुभव असतो, जेव्हा तुमच्या मेहनतीचे कौतुक होते आणि मी सर्वांसाठी खूप खूप आभार व्यक्त करू इच्छितो. मी माझ्या देशाला अभिमान वाटावा यासाठी परिश्रम करत राहील. सर्व पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा.”
Aap sabhi ke pyaar aur saath ke bina ye possible nahi ho pata. Ye ek bohot hi unbelievable feeling hoti hai Jab aapka hard work acknowledge kara jaata hai aur mai sab logo ke liye apna Bohot bohot abhaar vyakt karna chahta hu. 😊🙏 pic.twitter.com/yxEQJaqmRf
— Shikhar Dhawan (@SDhawan25) November 14, 2021
धवनला हा सन्मान दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देण्यात आला. धवनव्यातिरिक्त भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ती खेलरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला क्रिकेटपटू आहे.
दरम्यान, धवनच्या कारकिर्दीचा विचार केला तर, त्याने आतापर्यंत ३४ कसोटी, १४५ एकदिवसीय आणि ६८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये त्याने २३१५ कसोटी धावा, ६१०५ एकदिवसीय धावा आणि १७५९ आंतरराष्ट्रीय टी२० धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत २४ शतकं ठोकले आहेत, ज्यामध्ये १७ एकदिवसीय आणि ७ कसोटी शतकांचा सामावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बऱ्याच काळापासून कसोटी संघातून बाहेर असलेल्या ‘या’ ४ खेळाडूंना न्यूझीलंडविरुद्ध द्रविड देऊ शकतो संधी
हसन अलीची सेमीफायनलमधील चुकीबद्दल दिलगिरी; म्हणाला, ‘माझ्यावर खूप निराश होऊ नका…’
न्यूझीलंडच्या पदरी पुन्हा निराशा; ऑस्ट्रेलियाने नेहमीच केलयं नामोहरम