दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामी फलंदाज शिखर धवन हा आपल्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच तो मैदानावर अनेकदा आगळे वेगळे सेलिब्रेशन करताना ही दिसून आला आहे. क्षेत्ररक्षण करताना जेव्हा तो झेल टिपतो किंवा धावबाद करतो, तेव्हा तो मांडी ठोकून ‘गब्बर’ स्टाइलमध्ये हटके सेलिब्रेशन करताना दिसून येतो. आपल्या सेलिब्रेशनमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. परंतु पंजाब किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात फलंदाज नाबाद आहे, हे पाहून त्याने आगळी वेगळी प्रतिक्रीया दिली होती, ज्याची सर्वत्रच चर्चा रंगताना दिसून येत आहे.
तर झाले असे की, पंजाब संघाच्या धावा ६१ वर २ गडी बाद असताना रिषभ पंतने अक्षर पटेलला गोलंदाजी करण्यासाठी बोलवले होते. त्याने डेविड मलानला लेग साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू त्याच्या पॅडला जाऊन लागला होता. अक्षर पटेलने आणि रिषभ पंतने अंपायरकडे जोरदार मागणी केली होती. परंतु अंपयारने ती फेटाळून लावली होती.
त्यानंतर रिषभ पंतने डीआरएसची मागणी केली असता डेविड मलान थोडक्यात बचावला असल्याचे दिसून आले होते. हा निर्णय पाहताच शिखर धवनची प्रतिक्रीया पाहण्यासारखी होती. त्याने हृदय विकाराचा झटका आल्याची प्रतिक्रीया दिली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://twitter.com/CricketUnlimi/status/1388871328627716098?s=20
या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १६६ धावा केल्या होत्या. यामध्ये कर्णधार मयंक अगरवालने सर्वाधिक नाबाद ९९ धावांची खेळी केली होती. तर डेविड मालनने २६ धावांचे योगदान दिले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून शिखर धवनने सर्वाधिक नाबाद ६९ धावांची खेळी केली होती. तर पृथ्वी शॉने ३९ धावांचे योगदान दिले होते. दिल्ली कॅपिटल्स संघाने हा सामना ७ गडी राखून आपल्या नावावर केला होता. तसेच या विजयासह दिल्ली कॅपिटल्स संघाने गुणतालिकेत १२ गुणांसह पहिले स्थान गाठले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
SRHचं कंबरड मोडत शतक झळकावणारा बटलर म्हणतोय, “आता त्याची बोलती बंद करायची आहे”
एकीकडे विजयाचा जल्लोष तर दुसरीकडे वाईट बातमी, राजस्थानच्या ‘या’ खेळाडूचे आयपीएलमध्ये खेळणे कठीण
आधी नेतृत्त्व काढून घेतलं, मग संघातील स्थानही; डेविड वॉर्नरच्या भावाने SRHला घेतलं फैलावर