इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या विश्वचषक 2019 स्पर्धेतून भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन बाहेर पडला आहे. त्याला 9 जूनला ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यात डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले होते.त्याची ही अंगठ्याची दुखापत वेळेत बरी होणार नसल्याने त्याला या महत्त्वाच्या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.
तो विश्वचषकातून बाहेर पडण्याची घोषणा भारतीय संघाचे व्यवस्थापक सुनील सुब्रमनियम यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. त्यांनी सांगितले की ‘ शिखरच्या दुखापतीबद्दल अनेक तज्ञांची मते विचारात घेतली आहेत. तो मध्य जूलैपर्यंत बरा होणे कठीण आहे. त्यामुळे त्याला या विश्वचषकातून बाहेर पडावे लागत आहे. धवनच्या डाव्या हाताच्या अंगठ्याच्या खाली फ्रॅक्चर आहे.’
त्याचबरोबर त्यांनी युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला शिखरचा बदली खेळाडू म्हणून संघात घेण्यासाठी आय़सीसीकडे विनंती केली असल्याचेही सांगितले आहे.
Official Announcement 🚨🚨 – @SDhawan25 ruled out of the World Cup. We wish him a speedy recovery #TeamIndia #CWC19 pic.twitter.com/jdmEvt52qS
— BCCI (@BCCI) June 19, 2019
An official request has been made to replace Shikhar with @RishabPant777 in the World Cup squad #TeamIndia #CWC19 pic.twitter.com/WqXptyspSm
— BCCI (@BCCI) June 19, 2019
9 जूनला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या सामन्यात वेगवान गोलंदाज पॅट कमिंन्सने टाकलेला एक चेंडू शिखरच्या अंगठ्याला लागला होता. त्याच्यावर लगेचच भारताचे फिजिओ पॅट्रिक फऱ्हाट यांनी उपचार केले होते. परंतू नंतर करण्यात आलेल्या स्कॅननंतर त्याला फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे बीसीसीआयने त्याला 10-12 दिवस मेडिकल टीमच्या निरिक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच पंतला राखीव खेळाडू म्हणून इंग्लंडला बोलावून घेतले होते. पण अखेर धवनची दुखापत वेळेत बरी होणार नसल्याने त्याला स्पर्धेतूनच बाहेर पडावे लागले आहे.
Following several specialist opinions, he will remain in a cast until the middle of July and therefore will not be available for the remainder of #CWC19
— BCCI (@BCCI) June 19, 2019
शिखरने या विश्वचषकात दोन सामने खेळले आहेत. यात त्याने 125 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंगठ्याला चेंडू लागल्यानंतरही फलंदाजी करत 117 धावांची शतकी खेळी केली होती. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला होता. पण नंतर मात्र त्याला या दुखापतीमुळे खेळता आले नाही.
त्याच्या अनुपस्थितीत 16 जूनला पाकिस्तान विरुद्ध केएल राहुलने सलामीला फलंदाजी केली होती. त्यामुळे उर्वरित विश्वचषक स्पर्धेतही राहुलच रोहित शर्मासह सलामीला फलंदाजी करेल असे अपेक्षित आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नावर रोहित शर्माने दिले असे गमतीशीर उत्तर, पहा व्हिडिओ
–विराट कोहलीचा हा खास फोटो होतोय जोरदार व्हायरल