Shikhar Dhawan :- भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनने शनिवारी (24 ऑगस्ट) क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर, धवन त्याचा 11 वर्षांचा मुलगा जोरावरसाठी भावूक झाला आणि त्याने आशा व्यक्त केली की, माझ्या मुलाला निवृत्तीबद्दल समजेल. तसेच, धवनने आपल्या मुलालाही भावनिक संदेश दिला.
धवनने त्याची पत्नी आयशा मुखर्जी हिला ऑक्टोबर 2023 मध्ये घटस्फोट दिला. मात्र, शिखरला त्यांचा मुलगा जोरावरचा ताबा मिळू शकला नाही. मात्र, त्याला भेटीचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच, व्हिडिओ कॉलद्वारे बोलण्याची परवानगी देण्यात आली. याशिवाय जोरावरची धवनशी सातत्याने भेट करून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते. तथापि, धवनच्या अलीकडील पोस्टवरून असे सूचित होते की, त्याने अनेक महिन्यांपासून जोरावरला पाहिले नाही किंवा बोलला नाही. आता निवृत्तीनंतर धवनने मुलगा जोरावर याला संदेश दिला आहे.
शिखर म्हणाला, ‘जोरावर आता 11 वर्षांचा झाला आहे. मला आशा आहे की, त्याला माझी निवृत्ती आणि माझ्या क्रिकेट प्रवासाबद्दल माहिती असेल. एका क्रिकेटपटूपेक्षा, मला आवडेल की जोरावरने मला एक चांगला माणूस म्हणून लक्षात ठेवावे, जो चांगले काम करतो. त्याच्या सभोवतालच्या लोकांमध्ये सकारात्मकता आणतो.’
डिसेंबर 2023 मध्ये जोरावरला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना धवनने खुलासा केला होता की, त्याला जोरावरला पाहण्यास किंवा त्याच्याशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.
View this post on Instagram
तो पुढे म्हणाला, ‘मी दररोज जोरावरला संदेश लिहितो. मला माहित नाही की त्याला ते संदेश मिळत आहेत की नाही. मला आता फारआशा नाही. मी ते स्वीकारले आहे. मी एक वडील आहे आणि मी माझे कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न करत आहे. मला त्याची आठवण येते. मला वाईट वाटते पण मी त्याच्याशिवाय जगायला शिकलो आहे.’ शिखरने आयपीएल 2024 वेळी देखील, जोरावरच्या नावाची जर्सी बनवली होती.
हेही वाचा –
बाबर आझमचा फ्लॉप शो! बांगलादेशच्या पाकिस्तानवरील ऐतिहासिक विजयामागची 3 कारणं जाणून घ्या
बांगलादेशनं इतिहास रचला! पाकिस्तानची घरच्या मैदानावर नाचक्की
शाकिब अल हसननं पुन्हा संयम गमावला, मैदानावरील या कृतीनं सगळेच हैराण