---Advertisement---

रोहित शर्माच्या मुलीसमोर शिखर धवन करतोय ऍक्टिंग, व्हिडिओ झाला व्हायरल

On: सोमवार, नोव्हेंबर 4, 2019 7:03 PM
---Advertisement---

रविवारी (3 नोव्हेंबर)  भारत विरुद्ध बांगलादेश संघात (India vs Bangladesh ) पहिला टी20 (First T20I) आंतरराष्ट्रीय सामना दिल्लीत पार पडला. या सामन्यात बांगलादेशने 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर 1- 0 ने आघाडीही घेतली आहे.

या  सामन्यापूर्वी भारताचा फलंदाज शिखर धवनने त्याचा सलामीवीर साथीदार रोहित शर्माची मुलगी समायरा (Samaira) बरोबर मस्ती करण्याचा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/B4XYS_XnLT5/

या व्हिडिओमध्ये दिसते की शिखरने समायरा (Samaira) बरोबर वेळ घालवत खूप मस्ती केली.तसेच समायरा तिचे वडील रोहित शर्माच्या कुशीत बसली आहे आणि धवनच्या डोक्याला हात लावत आहे. तिच्या हात लावल्यामुळे धवन दुसऱ्या बाजूला कोसळण्याची अँक्टिंग करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

भारतीय संघाची सलामीवीरांची जोडी रोहित शर्मा आणि शिखर धवन हे दोघे चांगले मित्र आहेत. त्यांच्यातील मैत्री क्रिकेटच्या मैदानाबरोबरच मैदानाबाहेरही पाहायला मिळते.

शिखर धवनने टी20मध्ये भारताकडून खेळताना 56 सामन्यात 27.96 च्या सरासरीने 1454 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 9 अर्धशतकांचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---