भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर शिखर धवन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. तो त्याचे फोटो, व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. चाहतेही त्याच्या फोटो आणि व्हिडिओला पसंती दर्शवत लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडतात.
नुकताच शिखर धवनने एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात त्याचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. त्याने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CSWc1ybKvHW/?utm_source=ig_web_copy_link
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी सलामी देणाऱ्या शिखर धवनने बुधवारी हा व्हिडिओ शेअर केला. चाहत्यांनी हा व्हिडिओला खूप पसंती दर्शवली आहे. इंस्टाग्रामवर सुमारे 1.47 लाख लोकांनी व्हिडिओला लाईक केलंय. धवनने सनी देओलच्या गदर चित्रपटातील गाणे ‘मैं निकला गड्डी लेके’ यावर बाईक रायडींग करताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये तो कधी बाईक चालवताना दिसत आहे, कधी बसलेला तर कधी उभा. व्हिडिओमध्ये शिखर धवन इलेक्ट्रिकल बाईकवर फिरत आहे. धवन अनेकदा त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असे मजेदार व्हिडिओ शेअर करतो.
https://www.instagram.com/reel/CScGTDZqlrP/?utm_source=ig_web_copy_link
हेही वाचा – दोन वर्षांचा चिमुकला लाईव्ह सामन्यात घुसला अन् घडलं असं काही; व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ
क्रिकेटच्या विश्वात ‘गब्बर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या धवनने अलीकडेच श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भारतीय संघाचा कार्यभार स्वीकारला. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय मालिका जिंकली. परंतू, टी -20 मालिकेत 1-2 अशी हार पत्करावी लागली.
सध्या युएईमध्ये होणाऱ्या आयपीएल-2021 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी शिखर धवन सज्ज झाला आहे. त्याच्याकडेच सध्या चालू हंगामातील ऑरेंज कॅप आहे.
🖐🏽 Bless your 📱 screen with your favourite opening jodi 😍
Download now ⏬#YehHaiNayiDilli @SDhawan25 @PrithviShaw pic.twitter.com/Yxk5oly258
— Delhi Capitals (@DelhiCapitals) August 11, 2021
दिल्ली कॅपिटल्स संघाबद्दल बोलायचे झाले तर, संघ 22 सप्टेंबर रोजी दुबईत सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पहिला सामना खेळेल. दिल्ली साखळीतील शेवटचा सामना 8 ऑक्टोबर रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध खेळेल. सध्या दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहेत. रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली संघाने 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. आणि दिल्ली 12 गुणांसह दिल्ली पहिल्या स्थानावर आहे.
अधिक वाचा –
- नंबर वन हिटमॅन! ‘या’ यादीमध्ये पोहोचला अव्वलस्थानी
- जेम्स अँडरसनचा आणखी एक कीर्तिमान; ‘अशी’ कामगिरी करणारा बनला एकमेव वेगवान गोलंदाज