---Advertisement---

‘कितने आदमी थे’ डायलॉगवर शिखर धवनची कडक ऍक्टिंग, सिनेमातील ‘गब्बर’लाही देईल टक्कर!

On: बुधवार, डिसेंबर 22, 2021 11:43 PM
Dhawan-Acting-Video
---Advertisement---

शिखर धवन (Shikhar Dhawan) त्याच्या खराब फॉर्ममुळे भारतीय संघातून बाहेर आहे. देशांतर्गत स्पर्धा विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) सुद्धा त्याला चांगलं प्रदर्शन करता आलं नाही. दिल्लीकडून खेळताना तो ५ सामन्यात फक्त ५८ धावा करू शकला. तरीही त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघात निवडण्यात येण्याची शक्यता आहे. धवन मैदानाबरोबरच मैदानाबाहेर सुद्धा त्याच्या चाहत्यांचं मनोरंजन करण्यात कोणतीही कसर सोडत नाही.

https://www.instagram.com/reel/CXvw39_Bnma/?utm_source=ig_web_copy_link

गब्बर म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिखर धवनने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात तो ‘शोले’ (Sholay) चित्रपटाचा एक डायलॉग बोलताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये शिखरने समोरच्या माणसाला धरून विचारलं ‘किती माणसं होती?’ (कितने आदमी थे) त्यावर समोरचा माणूस म्हणाला ‘माहित नाही साहेब.’ (पता नाही जनाब) हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. धवनच्या या व्हिडीओवर चाहते सुद्धा खूप कमेंट्स करत आहेत.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी मिळू शकते संधी
देशांतर्गत स्पर्धेत खराब प्रदर्शन करूनही धवनला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात (India Tour of South Africa) संधी मिळू शकते. १२, ८, १४, १२ आणि ० हे त्याच्या विजय हजारे ट्रॉफीमधील शेवटच्या सामान्यांतील आकडे आहेत. विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad आणि वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. त्यामुळे निवडकर्त्यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. अशात दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी वनडे संघात निवडकर्त्यांची मात्र डोकेदुखी वाढणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---