---Advertisement---

शिखर धवनचा हा व्हिडियो सोशल मिडीयावर होतोय जोरदार व्हायरल…

On: गुरूवार, डिसेंबर 26, 2019 1:36 PM
---Advertisement---

दुखापतीनंतर दिल्ली रणजी संघात पुनरागमन करणारा भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने मंगळवारी स्वतःच्या मुलाबरोबर मजा करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला.

या व्हिडिओमध्ये धवन आपल्या मुलाबरोबर मस्ती करताना दिसत आहे. तसेच शिखर इतक्यादिवस सामना न खेळल्याबद्दल त्याचा मुलगा जोरावर शिखरला लाथा बुक्के मारताना दिसत आहे. तसेच जोरावर शिखरला विचारत आहे की तू इतक्यादिवस का खेळला नाही. तसेच नंतर त्याने शिखरची माफीही मागितली. 

https://www.instagram.com/p/B6c6QJNnrUz/

या व्हिडिओला कॅप्शन देताना शिखरने लिहिले की, ‘माझे मुख्य प्रशिक्षक मला मैदानावर खेळण्यासाठी नेहमी प्रेरित करत असतात. गब्बरला फक्त छोटा गब्बर मारू शकतो. जोरावर आणि माझी पत्नी सुट्टीवर भारतात आले आहेत. मी माझ्या कुटुंबासमवेत वेळ घालविण्यास खूप उत्सुक आहे.

धवनला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यादरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याच्या गुडघ्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली, त्याला 25 टाके घातले. पण आता तो फिट आहे, रणजी ट्राफी सामन्यात हैदराबादविरुद्ध तो दिल्लीची कमान सांभाळत आहे.

धवनसह वेगवान गोलंदाज इशांत शर्माही रणजी ट्राफी स्पर्धेत दिल्ली संघात आहेत. या सामन्यानंतर धवन श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी20 आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघात सामील होईल.

https://twitter.com/Maha_Sports/status/1209770151890968576

https://twitter.com/Maha_Sports/status/1209767507432591361

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---