भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने आजपर्यंत भारताकडून खेळताना अनेक मोठ्या खेळी केल्या आहेत. अनेकदा भारताला सामने जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. पण आता शिखरचा मुलगा झोरावरही त्याच्या पावलावर पाऊल टाकत असून क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे. हे पाहून धवनचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
धवनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो झोरावरचा आहे. या फोटोत झोरावर खूप आनंदी दिसत आहे. तसेच त्याच्या खांद्यावर एक क्रिकेटची किट बॅगदेखील आहे.
हा फोटो शेअर करत धवनने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्याच गोष्टी मुलालाही आवडतात. ही एक खूप चांगली भावना आहे. क्रिकेटबद्दल आमचे प्रेम आमच्या रक्तातून वाहते. झोरावरला मोठे होताना पाहणे आणि त्याला त्याचे स्वप्न आणि ध्येय पूर्ण करताना पाहण्यासाठी मी खूप उत्सूक आहे. तुझे बाबा तुला मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी तयार असतील. खूप प्रेम झोरावर!”
https://www.instagram.com/p/B9EEMC5HNQ3/?utm_source=ig_web_copy_link
या क्रिकेटपटूंच्या मुलांनीही घडवली क्रिकेटमध्ये कारकिर्द –
इफ्तिकार अली खान पतौडीचा मुलगा मन्सूर अली खान पतौडी, लाला अमरनाथचा मुलगा मोहिंदर अमरनाथ, विजय मांजरेकरांचा मुलगा संजय मांजरेकर, सुनिल गावस्करांचा मुलगा रोहन गावस्कर यांनी आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती.
तसेच योगराज सिंग यांचा मुलगा युवराज सिंग, रॉजर बिन्नींचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी आणि सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुुलकर यांनीही आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. याबरोबर सध्या वयोगटातील राहुल द्रविडचा मुलगाही शालेय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करताना दिसत आहे.
आता या यादीमध्ये शिखर धवनचा मुलगा झोरावरच्या नावाचाही समावेश होऊ शकतो.
अशी सुवर्णसंधी मयंक अगरवालला पुन्हा कधीही मिळणार नाही https://t.co/pWJFKOZ37l#म #मराठी #cricket #TeamIndia #INDvsNZ @mayankcricket
— Maha Sports (@Maha_Sports) February 28, 2020
शास्त्रींचा टीम इंडियाला खास सल्ला, 'जर पराभवाची चव चाखली नाही तर…'https://t.co/mm3vvAXZ7y#म #मराठी #cricket #TeamIndia #INDvsNZ
— Maha Sports (@Maha_Sports) February 28, 2020





