भारताचा दिग्गज क्रिकेटपटू शिखर धवन यानं या वर्षी ऑगस्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. मात्र त्यानंतर तो लेजेंड्स लीग क्रिकेट (LLC 2024) मध्ये खेळताना दिसला होता. आता धवन नेपाळ प्रीमियर लीग (NPL 2024) मध्ये देखील भाग घेणार आहे. NPL 2024 मध्ये तो कर्णाली याक्सकडून खेळताना दिसेल. नेपाळ प्रीमियर लीगचा हा पहिलाच हंगाम असेल, हे विशेष.
NPL 2024 मध्ये एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा 30 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि 21 डिसेंबरपर्यंत चालेल. लीगमध्ये एकूण 32 सामने खेळले जातील. स्पर्धेचं स्वरूप इंडियन प्रीमियर लीग (IPL) प्रमाणे असेल, जेथे प्लेऑफमध्ये एक एलिमिनेटर, दोन क्वालिफायर आणि नंतर अंतिम सामना खेळला जाईल.
कर्णाली याक्सच्या टीमनं स्पर्धेच्या प्रमोशनसाठी एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये शिखर धवन म्हणतो आहे की, “नमस्कार नेपाळ, मी नेपाळ प्रीमियर लीग खेळायला येत आहे. मी कर्णाली याक्ससाठी खेळणार आहे. मी नेपाळ आणि तेथील लोकांना भेटायला येत आहे. तयार व्हा. नवीन साहसासाठी सज्ज व्हा.”
नेपाळ प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात जिमी नीशम, मार्टिन गप्टिल, उन्मुक्त चंद आणि बेन कटिंगसह इतर अनेक मोठे खेळाडू खेळताना दिसतील. कर्णाली याक्सबद्दल बोलायचं झालं तर, शिखर धवन व्यतिरिक्त पाकिस्तानचा मोहम्मद हुसेन तलत, हाँगकाँगचा बाबर हयात आणि वेस्ट इंडिजचा चॅडविक वॉल्टन हे चार परदेशी खेळाडू या संघाकडून खेळणार आहेत. लीगचे सर्व सामने नेपाळमधील कीर्तीपूर येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या क्रिकेट मैदानावर खेळले जातील.
शिखर धवननं आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच इंडियन प्रीमियर लीगला अलविदा केला आहे. आयपीएलमध्ये 6700 हून अधिक धावा करणारा धवन आता आयपीएलमध्ये खेळणार नाही. तो शेवटचा पंजाब किंग्जकडून खेळताना दिसला होता.
हेही वाचा –
कसोटी वाचवण्यासाठी कोणता भारतीय खेळाडू 11 तास फलंदाजी करू शकतो? कोच गंभीरनं दिलं अनोखं उत्तर
आरसीबीनं रिलिज केल्यानंतर दोन आठवड्यातच ठोकलं त्रिशतक! मेगा लिलावात या खेळाडूवर लागू शकते मोठी बोली
दोन फलंदाजांनी ठोकलं नाबाद त्रिशतक! रणजी इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी






